Vishnu Solanki Dainik Gomantak
क्रीडा

'या' खेळाडूने 15 दिवसातच मुलगी अन् वडीलांना गमावले, अंत्यसंस्कार पाहिल्यानंतर...

बडोद्यासाठी रणजी करंडक (Ranji Trophy) खेळणाऱ्या विष्णू सोलंकीने 15 दिवसांत आपली एक दिवसाची मुलगी आणि वडीलांना गमावले.

दैनिक गोमन्तक

बडोद्यासाठी रणजी करंडक (Ranji Trophy) खेळणाऱ्या विष्णू सोलंकीने 15 दिवसांत आपली एक दिवसाची मुलगी आणि वडीलांना गमावले. 12 फेब्रुवारीला त्याच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर 27 फेब्रुवारीला विष्णूचे वडीलही त्याला सोडून गेले, परंतु त्याने खचून न जाता पुन्हा कमबॅक केले. विष्णूला त्याच्या संघासाठी खेळायचे आहे. आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारावरुन आल्यानंतर शानदार शतक झळकावले. त्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. आता वडिलांच्या जाण्यानंतरही त्याने सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख शिशिर हटंगडी (Shishir Hatangadi) यांनीही त्याच्या या कामगिरीला सलाम केला आहे. (Vishnu Solanki Lost His Daughter And Father In 15 Days)

दरम्यान, 29 वर्षीय विष्णू सोलंकी आपल्या फलंदाजीमधून शानदार कामगिरी केली. 25 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 41.97 च्या सरासरीने 1679 धावा केल्या आहेत. त्यात सात शतकांचाही समावेश आहे. त्याच वेळी, 39 लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याने 33.96 च्या सरासरीने 1019 धावा केल्या आहेत. T20 मध्ये सोलंकीने 46 सामन्यात 883 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी 31.53 आहे.

सोलंकी यांच्यासाठी फेब्रुवारी हा कठीण महिना ठरला

विष्णू सोलंकीची या वर्षी बडोद्याच्या रणजी संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्याला पुन्हा आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी करायची आहे. यंदा कोरोनामुळे रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यात होत असून, पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये सुरु होत होता. यावेळी सोलंकी बाबा होणार होता, मात्र त्याने क्रिकेटला प्राधान्य दिले. रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा सुरु होणार असताना सोलंकी बाबा झाला होता. 11 फेब्रुवारी रोजी त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. पहिल्यांदाच बाबा झालेल्या सोलंकी यांच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट होती.

सोलंकी यांना त्यांच्या मुलीचा आवाज कधीच ऐकू आला नाही

मात्र, सोलंकी यांचा आनंद फार काळ टिकला नाही. 12 फेब्रुवारी रोजी त्यांना कळले की, आपल्या एक दिवसाच्या मुलीचे निधन झाले आहे. त्याच दिवशी सोलंकी आपल्या घराकडे रवाना झाला. मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिला. यामध्ये तो बडोद्यासाठी पहिला सामनाही खेळू शकला नाही. त्यानंतर मात्र 17 फेब्रुवारीला तो संघात सामील झाला. आणि दुसऱ्या सामन्याची तयारी सुरु केली. चंदीगडविरुद्धच्या (Chandigarh) सामन्यात त्याने 103 धावांची नाबाद खेळी खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT