Virat Kohli | World Cup 2023 BCCI
क्रीडा

Virat Kohli: क्रिकेट, कोटला आणि कोहली! दिल्लीमध्ये खेळण्याबद्दल 'लोकल बॉय' विराट भावूक, म्हणाला...

World Cup 2023: विराटने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच दिल्लीत वर्ल्डकपचा सामना खेळण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Pranali Kodre

Virat Kohli react on Playing front of pavilion named after him at Delhi:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात बुधवारी सामना होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत असून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी खास आहे.

विराट लहानाचा मोठा दिल्लीमध्ये झाला असल्याने आता अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम नावाने ओळखले जाणारे फिरोज शहा कोटला हे स्टेडियम त्याचे घरचे स्टेडियम आहे. या स्टेडियमशी त्याच्या अनेक आठवणीही जोडलेल्या आहेत.

विशेष म्हणजे 2019 साली याच स्टेडियममधील एका पॅव्हेलियनला विराटचे नावही देण्यात आले आहे. याबद्दल विराटने केएल राहुलशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

विराटने सांगितले की 'माझ्यासाठी हे ते स्टेडियम आहे, जिथे मी वयोगटातील क्रिकेट खेळत मोठा झालो, जिथे मी रणजी क्रिकेट खेळलो. मी येथे भारतासाठीही खेळलो. त्या आठवणी नेहमीच तुमच्या मनात कायम राहातात. तुम्हाला ते जाणवते कारण तिथेच सर्वकाही सुरू झाले आहे. निवडकर्त्यांनी तिथेच सर्वात आधी पाहिले आहे आणि मला संधी दिली. तिकडे परत जाणे आणि अरुण जेटली स्टेडियमवर खेळणे खास असते.'

त्याचबरोबर विराट त्याच्या नावाच्या पॅव्हेलियनबद्दल म्हणाला, 'माझ्यासाठी ही खूप विचित्र भावना आहे की मी माझ्याच नावाच्या पॅव्हेलियन समोर खेळणार आहे. मला त्याबद्दल बोलायला फार आवडत नाही. पण हा खूप मोठा सन्मान आहे आणि मला याबद्दल आनंद आहे, कृतज्ञता आहे. ही अशी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मी कधीच विचार केला नव्हता.'

विराटसाठी वर्ल्डकपची शानदार सुरुवात

दरम्यान, वर्ल्डकप 2023 स्पर्धेची सुरुवात विराटसाठी खास झाली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करना भारताने 2 धावात 3 विकेट्स गमावल्या असताना भारताकडून विराट आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. या सामन्यात विराटने 85 धावांची खेळी केली आणि केएल राहुलने 97 धावांची खेळी केली. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT