Virat Kohli PTI
क्रीडा

Virat Kohli: 'माझी पत्नी, माझा हिरो समोर बसलेत आणि...', 50 व्या वनडे शतकानंतर विराटच्या भावना व्यक्त

India vs New Zealand: वानखेडे स्टेडियमवर सचिनसमोर 50 वे वनडे शतक केल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Virat Kohli 50th ODI Century:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने दणक्यात प्रवेश मिळवला आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड संघात रंगला. या सामन्यात भारताने 70 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीचेही मोठे योगदान राहिले.

विराटने या सामन्यात 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 50 वे शतक होते. त्यामुळे तो वनडेत 50 शतके ठोकणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडित काढला.

महत्त्वाच्या म्हणजे यावेळी वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. त्यामुळे विराट 50 वे शतक पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासमोर नतमस्तकही झाला.

दरम्यान, 50 वे वनडे शतक झाल्यानंतर विराटने स्वप्नपूर्तीचा हा क्षण असल्याचे म्हटले. तो म्हणाला, 'मी कोलकातामध्येच म्हटले होते की दिग्गज सचिन तेंडुलकरने माझे अभिनंदन केले होते. हे सर्व स्वप्नासारखे वाटत आहे, जे पूर्ण झाले आहे. माझ्यासाठी ही खूप अविश्वसनीय भावना आहे.'

'आज एक मोठा सामना होता, मला माझी जबाबदारी पार पाडायची होती, जशी मी संपूर्ण स्पर्धेत पार पाडली होती. त्यामुळे माझ्या आजूबाजूला खेळणारे खेळाडू आक्रमक खेळतील. मला आनंद आहे की सर्वकाही चांगले जुळून आले आणि आम्ही धावफलकावर चांगल्या धावा लावल्या.'

त्याचबरोबर विराटने अनुष्का शर्माबद्दलही प्रतिक्रिया दिली. अनुष्काही स्टेडियममध्ये उपस्थित होती.

विराट म्हणाला, 'अनुष्का तिथे बसलेली होती, सचिन पाजीही इथे होते. माझ्यासाठी याबद्दल व्यक्त होणेही कठीण आहे. जर मी एखादं परिपूर्ण चित्र रंगवू शकतो, तर मी हेच चित्र रंगवेल. माझी अर्धांगिनी, जिच्यावर मी खूप प्रेम करतो, ती तिथे बसली आहे, माझा आदर्श असलेला व्यक्ती तिथे बसलेला आहे आणि मी त्या सर्वांसमोर आणि वानखेडे स्टेडियममध्ये 50 वे वनडे शतक ठोकले, ते खूप शानदार होते.'

दरम्यान, विराटने 50 वनडे शतके केल्यानंतर सचिननेही त्याचे कौतुक केले.

भारताचा विजय

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताकडून विराट व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 105 धावांची शतकी खेळी केली. तसेच शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या, तर कर्णधार रोहित शर्माने 47 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 50 षटकात 4 बाद 397 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 3 विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.

त्यानंतर न्यूझीलंडचा 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 48.5 षटकात सर्वबाद 327 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने 134 धावांची शानदार खेळी केली. तसेच केन विलियम्सनने 69 धावांची खेळी केली, तर ग्लेन फिलिप्सने 41 धावांची खेळी केली. मात्र, त्यांना न्यूझीलंडला विजय मिळवून देता आला नाही.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 विकेट घेता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape Bicholim Cow Transport: गुरांच्या निर्दयी स्थलांतराच्या व्हिडिओवर उच्चन्यायालयाची दखल; ध्यान फाउंडेशनला अंतरिम दिलासा नाकारला

Horoscope: श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी 'या' राशींवर भोलेनाथांची विशेष कृपा! नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात यशाचे योग

Kushavati District Six Assembly Seats: कुशावती मतदारसंघांच्या मुद्द्यावरून गोव्यात राजकीय वाद! 8 पैकी 6 जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर गोवा फॉरवर्ड अन् भाजपचा जोरदार हल्ला

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

SCROLL FOR NEXT