Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: मास्टर-ब्लास्टरच्या वर्ल्ड रेकॉर्डवर कोहलीचा डोळा, हव्यात केवळ 'इतक्या' धावा

Pranali Kodre

India vs New Zealand, 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मंगळवारी वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 24 जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. या सामन्यादरम्या विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडण्याची संधी आहे.

विराट मोडू शकतो सचिनचे विक्रम

जर या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना विजय मिळवला आणि विराटने 62 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली, तर तो वनडे क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.

सध्या वनडेत धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 127 वनडे सामन्यांत धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 55.45 च्या सरासरीने 5490 धावा केल्या आहेत.

या यादीत विराट 5428 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांव्यतिरिक्त धावांचा यशस्वी पाठलाग करताना 5000 वैयक्तिक धावांचा टप्पा कोणालाही पार करता आलेला नाही.

याशिवाय जर विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा भारतीय खेळाडू ठरेल.

सध्या या यादीत विराट आणि सचिन संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहे. विराट आणि सचिन या दोघांनीही आत्तापर्यंत प्रत्येकी 13 वेळा न्यूझीलंडविरुद्ध वनडेत 50 धावांचा टप्पा पार केला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आहे. त्याने 9 वेळा न्यूझीलंडविरुद्ध वनडेत 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

(Virat Kohli on verge of breaking a world record of Sachin Tendulkar)

विराट सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमाच्याही जवळ

सध्या वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन 49 शतकांसह अव्वल क्रमांकावर आहे. तसेच विराट 46 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विराटला सचिनचा 49 वनडे शतकांचा विक्रम मोडण्यासाठी केवळ 4 शतकांची गरज आहे.

भारताने जिंकली मालिका

सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका आधीच खिशात घातली आहे. आता तिसरा सामना जिंकून न्यूझीलंडवर निर्भेळ यश मिळवण्याची भारतीय संघाला संधी आहे. तसेच न्यूझीलंड या सामन्यात विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Tim Cook: ‘’ॲपलच्या भारतातील कामगिरीवर खूप खूश, प्रतिस्पर्धी म्हणून राहण्यासाठी...’’

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT