Virat Kohli With a Fan Instagram
क्रीडा

Virat Kohli Fan: 'मी 40 तासांहून अधिक...', विराटने चेन्नईतील फॅनचा दिवस बनवला स्पेशल, पाहा Video

Team India: विराटचं पुन्हा दिसलं मोठं मन! चेन्नईतील चाहत्याला दिली स्पेशल भेट, Video व्हायरल

Pranali Kodre

Virat Kohli meets a Fan from Chennai and gives autographs:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेला भारतात सुरुवात झाली आहे. यजमान भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना रविवारी (8 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने एका चाहत्याचा दिवस खास बनवला आहे.

बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटूपटू विराट कोहली सरावादरम्यान एका दिव्यांग चाहत्याला भेटल्याचे दिसत आहे.

या चाहत्याचे नाव श्रीनिवास असून तो चेन्नईचा आहे. त्याने विराटला त्याचे काढलेले चित्रही दिले होते, ज्यावर विराटने स्वाक्षरी केल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. तसेच विराटने त्याच्याबरोबर फोटोही काढला.

या खास क्षणांबद्दल श्रीनिवासणे आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. बीसीसीआयने शेअर कलेल्या व्हिडिओमध्ये श्रीनिवास सांगत आहे की 'मी श्रीनिवास, मी चेन्नईचा असून ग्राफिक डिजायनिंगचे शिक्षण घेत आहे. मी इथे तिकीट खरेदी करण्यासाठी आलो होतो, पण मला अखेर विराट कोहलीला भेटण्याची संधी मिळाली. त्याने यावर (विराटच्या चित्रावर) स्वाक्षरीही केली.'

'हो, हे चित्र मी स्वत: काढले आहे. मला हे चित्र काढण्यासाठी 40 तासांहून अधिक वेळ लागला. मी खूप नर्वस होतो, तो थेट माझ्याकडे आला होता.'

'मला वाटले की मी स्वप्नच पाहात आहे. तो माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारले की चित्रावर स्वाक्षरी हवी आहे का? मी लगेचच म्हणालो, हो सर आणि मी त्याला फोटोसाठीही विचारले, तेव्हा तो म्हणाला, हो हो नक्कीच फोटो काढू.'

दरम्यान, विराटने अशाप्रकारे चाहत्यांना भेटण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही तो अनेकदा त्याच्या चाहत्यांना भेटत असतो.

तथापि, भारतीय संघ सध्या चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्डकप 2023 मधील पहिल्या सामन्यासाठी तयारी करत आहे. भारतीय संघाचा सराव सध्या सुरू आहे. दरम्यान, भारतीय संघ 12 वर्षांनी भारतात वर्ल्डकपचे सामने खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी साखळी सामन्यांचे वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध नेदरलँड्स, बंगळुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT