Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: विराट कोहलीने केला वर्ल्ड रेकॉर्ड!

IND vs ENG: विराट कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

Virat Kohli Biggest Record: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने असा विश्वविक्रम केला आहे, जो आतापर्यंत जगातील कोणताही फलंदाज करु शकलेला नाही. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

विराट कोहलीने हा मोठा विश्वविक्रम केला

T20 विश्वचषक 2022 च्या इंग्लंडविरुद्धच्या (England) उपांत्य फेरीच्या सामन्यात, विराट कोहलीने (Virat Kohli) 42 वी धाव पूर्ण करताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात विराट कोहलीने 50 धावा केल्या. यासह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या आता 4008 धावा झाल्या आहेत. विराटने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत. आतापर्यंत विराटने 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 52.73 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

1. विराट कोहली (भारत) - 115 सामने, 4008 धावा

2. रोहित शर्मा (भारत) - 148 सामने, 3853 धावा

3. मार्टिन गुप्टिल (NZ) - 122 सामने, 3531 धावा

4. बाबर आझम (पाकिस्तान) - 98 सामने, 3323 धावा

5. पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) - 121 सामने, 3181 धावा

एकूण टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - 463 सामन्यात 14562 धावा

2. किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) - 614 सामन्यात 11915 धावा

3. शोएब मलिक (पाकिस्तान) - 481 सामन्यात 11902 धावा

4. विराट कोहली (भारत) - 359 सामन्यात 11276 धावा

5. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 336 सामन्यात 11080 धावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New BJP President: नितीन नबीन भाजपचे नवे 'सारथी'! अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT