Rohit Sharma- Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL2023: विराट अन् रोहित येणार आमनेसामने

IPL2023: गेल्या सात आठ वर्षापासून मुंबई इंडियन्सनं पहिली मॅच हारण्याचा पायंडा पाडला आहे.

दैनिक गोमन्तक

IPL2023: आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाली असून प्रत्येक संघ आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. चाहते आपल्या आवडत्या संघाची मॅच बघण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या दोन मॅच होणार आहेत.

पहिला सामना सनरायझर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार असून हा सामना हैद्राबादच्या घरच्या मैदानावर होणार आहे.

सनरायझर्स हैद्राबादचा कॅप्टन एडन मारकर्म ऐवजी भुवनेश्वर कुमार आजच्या सामन्याचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यावर अनेकांचे लक्ष असणार आहे कारण विराट आणि रोहित या संघाचे कर्णधार म्हणून एकमेकांसमोर उभे असणार आहेत.

याशिवाय गेल्या सात आठ वर्षापासून मुंबई इंडियन्सनं पहिली मॅच हारण्याचा पायंडा पाडला आहे. या सामन्याची आणखी एक विशेष बाब म्हणजे 3 वर्षानंतर बेंगलुरुचा संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स बेंगलुरुला घरच्या मैदानावर हरवणार की पहिला सामना हरण्याचा आपला पायंडा कायम ठेवणार हे पाहण हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स त्यांचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला. पण याचदरम्यान केकेआरमधील दोन खेळाडू पुढील काही सामन्यात खेळणार नसल्याची बातमी समोर आली आहे.

शाकिब अल हसन आणि लिटन दास सध्या हे दोन्ही खेळाडू बांगलादेशमध्येच आहेत. सध्या आयर्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या कसोटी सामन्यासाठी शाकिब आणि लिटन या दोघांचाही बांगलादेश संघात समावेश आहे. हा कसोटी सामना झाल्यानंतर हे दोघेही संघात परतणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT