Vinoo Mankad Trophy 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Vinoo Mankad Trophy 2023: छत्तीसगडच्या गोलंदाजांसमोर गोव्याची नांगी; 211 धावांनी मोठ्या पराभवाची नामुष्की

विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा सलग दुसरा पराभव

किशोर पेटकर

Vinoo Mankad Trophy 2023: गोव्याच्या 19 वर्षांखालील मुलांनी बुधवारी छत्तीसगडच्या गोलंदाजांसमोर साफ नांगी टाकली, त्यामुळे विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत त्यांच्या 211 धावांनी सामना गमावण्याची नामुष्की ओढवली.

पुदुचेरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सुरवातीला दोन्ही सामने जिंकल्यानंतर गोव्याला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. छत्तीसगडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 302 धावा केल्या. नंतर गोव्याचा डाव अवघ्या 91 धावांत संपुष्टात आला.

छत्तीसगडच्या विकल्प तिवारी याने नाबाद शतक ठोकताना 108 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 103 धावा केल्या.

त्याने प्रथम जाचक (73, 83 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली, तर विवेक यादव (नाबाद 71, 30 चेंडू, 4 चौकार, 6 षटकार) याच्यासह सहाव्या विकेटसाठी 88 धावांची अभेद्य भागीदारी रचली.

प्रथम व विवेक यांनी गोव्याच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढविला.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड ः 50 षटकांत 5 बाद 302 (विकल्प तिवारी नाबाद 103, प्रथम जाचक 73, विवेक यादव नाबाद 71, पुंडलिक नाईक 10-2-54-2, युवराज सिंग 10-0-65-0, स्वप्नील गावकर 4-0-31-0, यश कसवणकर 10-0-38-1, शिवांक देसाई 10-0-65-1, शंतनू नेवगी 6-0-65-1)

वि. वि. गोवा ः 35.2 षटकांत सर्वबाद 91 (वीर यादव 1, शंतनू नेवगी 0, दर्पण पागी 21, मल्हार नाईक 8, यश कसवणकर 17, जीवनकुमार चित्तेम 22, दिशांक मिस्कीन 7, पुंडलिक नाईक 0, युवराज सिंग नाबाद 5, शिवांक देसाई 1, स्वप्नील गावकर 0, सूर्यकांत तिवारी 2-14, वरुणसिंग भुई 3-9, अभ्युदय सिंग 3-27).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT