Rahul Dravid Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: द्रविडचा लैंगिक शब्दावरून पत्रकार परिषदेत उडाला गोंधळ, हसत म्हणाला...

पाकिस्तानच्या गोलंदाजीचे कौतुक करताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत एक मजेदार कमेंट केली.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: आशिया चषकाच्या सुपर-4 टप्प्यात आज दुबईत भारतीय संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा दोन्ही संघांमध्ये सामना झाला तेव्हा तो खूपच रोमहर्षक झाला होता. भारतीय संघाने हा सामना 5 विकेटने जिंकला. आज भारत-पाकिस्तान (INDvsPAK) पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना पुन्हा एकदा चुरशीचा होणार असल्याची चाहत्यांना आशा आहे. (VIDEO Rahul Dravid press conference)

मात्र, त्या सामन्यात भारतीय संघाची शीर्ष फळी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर झुंजल्याचे दिसून आले. जिथे केएल राहुल आणि रोहित शर्मा लवकर बाद झाले. विराट कोहलीला सुरुवातीलाच परतावे लागले. पाकिस्तानच्या गोलंदाजीचे कौतुक करताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत एक मजेदार कमेंट केली.

राहुल द्रविड म्हणाला, 'तुम्ही त्यांच्या गोलंदाजी आक्रमणाचा आदर केला पाहिजे आणि मला विश्वास आहे की आमच्याकडेही उत्कृष्ट गोलंदाज आहे. मला एक शब्द वापरायचा आहे पण तो वापरता येत नाही.' द्रविड काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल माध्यमांमधून शब्द येऊ लागले, त्यानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणाले की हा चार अक्षरी शब्द आहे, ज्याची सुरुवात एस पासून होते. द्रविडच्या या बोलण्याने तिथे उपस्थित सर्वजण खूप हसले.

आज आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) पुन्हा एकदा भिडणार आहेत. या मोठ्या सामन्याच्या एक दिवस आधी शनिवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सामनापूर्व पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तो आपला स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल मत व्यक्त केले. विराट किती धावा करतो याला महत्त्व देत नाही, तर विराट धावा कशा करतो याला महत्त्व देतो, असे म्हणत कोहलीला प्रोत्साहन दिले.

'संघात पहिला पसंतीचा यष्टिरक्षक नाही'

राहुल द्रविड ऋषभ पंतवर म्हणाला, 'संघात पहिला पसंतीचा यष्टीरक्षक नाही. आम्ही परिस्थिती, मैदानाची स्थिती आणि प्रतिस्पर्धी संघानुसार खेळतो आणि त्यानुसार सर्वोत्तम इलेव्हन निवडतो. वेगवेगळ्या परिस्थितींसाठी नेहमीच समान निवड असू शकत नाही. त्या दिवशी पाकिस्तानविरुद्ध, आम्हाला वाटले की दिनेश (कार्तिक) आमच्यासाठी योग्य पर्याय आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT