KL Rahul | Venkatesh Prasad | Suniel Shetty  Dainik Gomantak
क्रीडा

Venkatesh Prasad: सासऱ्याला सोबत घेत वेंकटेश प्रसादची केएल राहुलसाठी सिक्रेट प्रार्थना, Photo व्हायरल

Photo: वेंकटेश प्रसादने अभिनेता सुनील शेट्टीसह केएल राहुलसाठी गुपचूप प्रार्थना केली आहे.

Pranali Kodre

Venkatesh Prasad secretly prayed for KL Rahul to have great ICC Cricket world cup 2023:

भारतीय क्रिकेट संघासमोर येत्या 4 महिन्यात मोठी आव्हाने असणार आहेत. आगामी काळात भारताला आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप या दोन महत्त्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. याच आधी वेंकटेश प्रसादने बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीसह भारतीय संघासाठी आणि केएल राहुलसाठी प्रार्थना केली आहे.

दरम्यान 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी सोमवारी (21 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात केएल राहुलचेही पुनरागमन झाले आहे.

केएल राहुल आयपीएल 2023 दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर होता. त्यांच्या मांडीवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण तो यातून सावरला असून पुनरागमन करण्यास सज्ज आहे.

या स्पर्धेपूर्वी वेंकटेश प्रसादने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटमध्ये त्याच्याबरोबर केएल राहुलचा सासरा सुनील शेट्टीही दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रसादने माहिती दिली की त्याने सुनील शेट्टीसह अमेरिकेतील न्यू जर्सीमधील स्वामी नारायण मंदिराला भेट दिली.

त्याने लिहिले की 'आण्णाबरोबर न्यू जर्सीतील स्वामी नारायण मंदिराला भेट दिली. भारतवासियांच्या कल्याणासाठी आणि भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करावी यासाठी प्रार्थना केली.'

'तसेच केएल राहुलने चौफेर फटकेबाजी करावी आणि वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करून माझ्यासारख्या टिकाकारांना शांत करावे, यासाठी गुप्तपणे प्रार्थना केली. सर्व आनंदी राहा.'

खंरतर वेंकटेश प्रसादने यापूर्वी अनेकदा केएल राहुलवर टीका केली आहे. त्याने यापूर्वी त्याची कामगिरी दाखवत त्याच्या भारतीय संघातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच त्याला फॉर्म गमावूनही सातत्याने संधी देण्याबद्दलही त्याने आक्षेप घेतला होता.

केएल राहुल आशिया चषकातील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता

केएल राहुल मांडीवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरला असला आणि त्याचे आशिया चषकासाठी भारतीय संघात पुनरागमन झाले असले, तरी त्याला छोटी दुखापत आहे. याबद्दल भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकरने सांगितले होते. त्यामुळे त्याला कदाचीत आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT