Goa Sports News Dainik Gomantak
क्रीडा

स्पर्धेत जीएफए फुटबॉल धेंपो क्लबने वास्कोला बरोबरीत रोखले

एफसी गोवा व सेझा अकादमीलाही प्रत्येकी एक गुण

Kishor Petkar

पणजी : जीएफए अध्यक्षीय करंडक फुटबॉल स्पर्धेच्या सुपर लीग फेरीत धेंपो स्पोर्टस क्लबने पिछाडीवरून वास्को स्पोर्टस क्लबला 2-2 असे गोलबरोबरीत रोखले. आणखी एका सामन्यात एफसी गोवा आणि सेझा फुटबॉल अकादमीस 1-1 गोलबरोबरीमुळे प्रत्येकी एक गुण मिळाला.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर वास्को क्लब विश्रांतीला एका गोलने आघाडीवर होता. सॅव्हलन फर्नांडिसने 16व्या मिनिटास सामन्यातील पहिला गोल केला. नंतर 47व्या मिनिटास पेद्रू गोन्साल्विसच्या गोलमुळे धेंपो क्लबने बरोबरी साधली. 57व्या मिनिटास बीव्हन फर्नांडिसच्या गोलमुळे वास्को क्लबला पुन्हा आघाडी प्राप्त झाली. मात्र धेंपो क्लबच्या डॅरेल मास्कारेन्हास याने 68व्या गोल केल्यामुळे सामन्यात पुन्हा बरोबरी झाली.

साल्वादोर द मुंद येथील मैदानावरही एफसी गोवानेही पिछाडीवरून बरोबरीच्या गुणाची कमाई केली. महंमद फाहीझ याने 17व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे सेझा अकादमीचा संघ आघाडीवर राहिला. 75व्या मिनिटास डेल्टन कुलासोने गोल केल्यामुळे एफसी गोवास पराभव टाळता आला.

मनोराची वेळसाव क्लबवर मात

स्पर्धेच्या पदावनती फेरीत मंगळवारी मडगाव येथील चौगुले महाविद्यालय मैदानावर यूथ क्लब ऑफ मनोरा संघाने वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 3-1 असा चमकदार विजय मिळविला. वेळसावच्या कॅजिटन फर्नांडिसने 26व्या मिनिटास गोल केल्यानंतर मनोरा संघाने उत्तरार्धात तीन गोल नोंदवून सामना जिंकला. मनोरा संघास पूर्ण तीन गुण मिळवून देताना अर्घ्य रॉय याने 47व्या, बदली एल्डन कुलासोने 64व्या, तर महंमद फरिद याने 69व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT