Usman Khawaja Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs PAK: वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचा त्याग करून ख्वाजा जाणार पाकिस्तान दौऱ्यावर

24 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याने दोन्ही देशांसाठी ही ऐतिहासिक मालिका आहे.

दैनिक गोमन्तक

ऍशेस मालिकेत इंग्लिश गोलंदाजांना जोरदार मुसंडी मारणाऱ्या उस्मान ख्वाजाचा (Usman Khawaja) 18 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे . ऑस्ट्रेलियन (Pakistan vs Australia) संघ पुढील महिन्यात पाकिस्तानसोबत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 24 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याने दोन्ही देशांसाठी ही ऐतिहासिक मालिका आहे. शेवटचा संघ 1998 मध्ये पाकिस्तानला गेला होता. (Australia vs Pakistan)

ऑस्ट्रेलियासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा असून ख्वाजाला या दौऱ्याचे महत्त्व पटले आहे. ख्वाजा पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना त्याचे दुसरे अपत्य या जगात येणार असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत ख्वाजासाठी पाकिस्तानचा दौरा आणि कुटुंबाचा पाठिंबा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाकिस्तानात जन्मलेला ऑस्ट्रेलियन फलंदाजाने दोघांपैकी एकाची निवड केली आहे.

ख्वाजा जाणार पाकिस्तान दौऱ्यावर

वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचा त्याग करून पाकिस्तान दौऱ्याला ख्वाजाने प्राधान्य दिले. त्याची पत्नी त्याला खूप सपोर्ट करते. या दौऱ्याचे काय महत्व आहे हे तिलाही माहिती असल्याचे ख्वाजाने सांगितले. ऑस्ट्रेलिया कसोटी संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी त्याला खरोखरच कठोर परिश्रम करावे लागतील असेही तो म्हणाला.

ख्वाजाने अॅशेस मालिकेतील सिडनी कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावले होते. ख्वाजाचा जन्म 18 डिसेंबर 1986 रोजी इस्लामाबाद, पाकिस्तान येथे झाला. तो 5 वर्षांचा असताना त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. ख्वाजा पायलट देखील आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने न्यू साउथ वेल्स विद्यापीठातून विमानचालकाची पदवी मिळवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT