Rohan Bopanna-Matthew Ebden Dainik Gomantak
क्रीडा

US Open 2023: रोहन बोपण्णा-मॅथ्यू एब्डेन जोडीचा जलवा, सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक!

US Open 2023: भारताचा स्टार टेनिसपटू रोहम बोपण्णा याने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

Manish Jadhav

US Open 2023: भारताचा स्टार टेनिसपटू रोहम बोपण्णा याने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने मॅथ्यू एब्डेनसोबत यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डेन यांनी सुरुवातीच्या सेटमध्ये सात सेट पॉइंट वाचवून नॅथॅनियल लॅमन्स आणि जॅक्सन विथ्रो यांचा पराभव केला. यंदाच्या ग्रँडस्लॅममध्ये त्याने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे.

दरम्यान, रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डेन या इंडो-ऑस्ट्रेलियन जोडीने हार्ड कोर्ट मेजरच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकन कॉम्बोचा 7-6(10) 6-1 असा पराभव केला.

याआधी बोपण्णा आणि एब्डेन यांनी विम्बल्डन चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठली होती. जिथे त्यांना वेस्ली कुलहॉफ आणि नील स्कुप्स्की यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी

दुसरीकडे, 43 वर्षीय बोपण्णाकडे कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची मोठी संधी आहे. बोपण्णाला ही संधी सोडायला आवडणार नाही.

2010 च्या यूएस ओपनमध्ये, बोपण्णाला पहिल्या मोठ्या अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळाली होती. त्या वर्षी त्याने पाकिस्तानच्या (Pakistan) इसम-उल-हकसोबत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

या जोडीशी सामना होणार

रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्डेन उपांत्य फेरीत पियरे-ह्युग्स हर्बर्ट आणि निकोलस माहुत या फ्रेंच जोडीशी भिडतील. या दोघांनी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या (America) रॉबर्ट गॅलोवे आणि फ्रान्सच्या अल्बानो ऑलिव्हेटी या जोडीचा पराभव केला.

याआधी, बोपण्णा मिश्र दुहेरीच्या स्पर्धेतून दुसऱ्या फेरीत इंडोनेशियन जोडीदार अल्डिला सुतजियाडीकडून पराभूत होऊन बाहेर पडला होता, पण त्याला या वेळी पुरुष दुहेरीत आणखी एक संधी आहे. त्यांचा उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT