Uruguay vs Korea Republic Dainik Gomantak
क्रीडा

Uruguay vs Korea Republic: उरूग्वे-कोरिया सामनाही बरोबरीत

दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण; खेळाडुंनी दवडल्या गोल करण्याच्या सोप्या संधी

Akshay Nirmale

Uruguay vs Korea Republic: फिफा वर्ल्डकपमध्ये गुरूवारी ग्रुप एच मध्ये उरूग्वे विरूद्ध कोरिया रिपब्लिक सामना अनिर्णित ठरला. फर्स्ट हाफमध्ये गोलशुन्य बरोबरी राहिल्यानंतर दोन्ही संघांनी सेकंड हाफमध्ये गोलसाठी खूप प्रयत्न केले. पण दोन्ही संघातील खेळाडूंनी अनेक सोप्या संधी दवडल्या. पुर्णवेळेसह भरपाई वेळेत गोलशुन्य बरोबरी राहिली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. (FIFA World Cup 2022)

हा सामना एजुकेशन सिटी स्टेडियमवर झाला. दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. तुलनेत उरूग्वेने चेंडुवर अधिक नियंत्रण राखले. दोन्ही संघांपैकी उरूग्वेचे पासिंग जास्त अचूक होते. धसमुसळ्या खेळाबद्दल उरूग्वेच्या एका खेळाडूला यलो कार्ड दाखविण्यात आले. पहिल्या हाफमध्ये गोलशुन्य बरोबरी राहिली. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या काही सोप्या संधी दवडल्या.

कोरियाचा कर्णधार सोन ह्युंगमिन याचा वेग कुठल्याही डिफेडंरला थकवणारा आहे. पण तरी कोरियाला गोल करता आला नाही. उरूग्वेचा स्टार खेळाडू लुईस सोरेझला देखील चमक दाखवता आली नाही. उरूग्वे संघ 2010 च्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील उपविजेता आहे. दरम्यान, कोरियाचा हा 11वा फिफा वर्ल्डकप आहे. आशियाई देशांमध्ये कोरियानेच सर्वाधिक वेळा फिफा वर्ल्डकप खेळला आहे. फिफा रँकिंगमध्ये उरूग्वे 14 व्या तर कोरिया 28 व्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma: मुंबईच्या राजाला झालंय तरी काय? 'हॉस्पिटल'मधल्या व्हिडिओमुळं चाहते टेन्शनमध्ये Watch Video

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास रोखलं म्हणून गोळी घातली; अमेरिकेत भारतीय तरुणाचा खून

Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू,भाजपकडे अधिक खासदार; पण विरोधकांना 'क्रॉस व्होटिंग'ची आशा

SCROLL FOR NEXT