U-15 Cricket Dainik Gomantak
क्रीडा

U-15 Cricket Tournament: 'शिवाजी पार्क'ने विजय आयसीई'ला नमवले

भिकू पै आंगले क्रिकेट: 15 वर्षांखालील स्पर्धेत विजय संघावर मात

दैनिक गोमन्तक

पणजी: मुंबईच्या शिवाजी पार्क जिमखाना संघाने अखिल भारतीय भिकू पै आंगले करंडक 15 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविले. शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी विजय आयसीई संघावर आठ विकेट राखून मात केली. सामना मडगाव येथील केआरसी मैदानावर झाला.

(U-15 Cricket Tournament Shivaji Park Gymkhana team win)

विजय आयसीई संघाने प्रथम फलंदाजी करताना 43.3 षटकांत सर्वबाद 145 धावा केल्या. त्यांच्या आरव याने 49, तर अंकित राम याने 22 धावा केल्या. शिवाजी पार्कच्या धीर शाह याने 15 धावांत 3, अथर्व अधिकारीने 29 धावांत 3, वेदांत देसाईने 39 धावांत 3 गडी बाद केले. रझा मिर्झा याच्या नाबाद 72 धावा, तसेच मीत पटेल (29) व सोहम साळी (24) यांच्या योगदानाच्या बळावर शिवाजी पार्क संघाने 28.3 षटकांत 2 बाद 146 धावा करून विजेतेपद प्राप्त केले.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव रोहन देसाई, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अभियंता जी. शशिधर, माशे क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र नाईक, मडगाव क्रिकेट अकादमीचे सचिव शौमिक पै आंगले यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

शिवाजी पार्कचा धीर शाह (अंतिम सामन्याचा मानकरी), विजय संघाचा अंकित राम (स्पर्धेचा मानकरी), शिवाजी पार्कचा रझा मिर्झा (उत्कृष्ट फलंदाज), विजय संघाचा सुजल साहानी (उत्कृष्ट गोलंदाज) यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT