CWG2022
CWG2022 Dainik Gomantak
क्रीडा

Commonwealth Games नंतर पाकिस्तानचे दोन बॉक्सर बर्मिंगहॅममध्ये 2 पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता; चौकशी सुरू

दैनिक गोमन्तक

कॉमनवेल्थ गेम्स संपल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे बॉक्सर सुलेमान बलोच आणि नाझीर उल्ला खान हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोपानंतर बर्मिंगहॅममध्ये बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने बॉक्सर्सचा शोध घेत आहे. नझीर आणि सुलेमान यांची प्रवासी कागदपत्रे अजूनही पीबीएफच्या ताब्यात असल्याचे एका वृत्ताने माहिती दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पाकिस्तानला जाण्यापूर्वी विमानतळावरून बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तान ऑलिम्पिक संघटनेने या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पीओएचे सरचिटणीस मोहम्मद खालिद महमूद म्हणाले, "आम्ही या बॉक्सर्सना कोणत्याही किंमतीत देशाचे नाव खराब करू देणार नाही. ब्रिटिश पोलीस त्यांना लवकरच शोधून काढतील."

उल्लेखनीय म्हणजे, हेवीवेट बॉक्सर (86-92kg) नाझीर 16व्या फेरीत बाद झाला, तर सुलेमान बलोच नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG) लाइट वेल्टरवेट प्रकारात (60-63.5kg) 32व्या फेरीत पराभूत झाला.

कॉमनवेल्थ गेम्ससाठी पाकिस्तानच्या तुकडीत पाच बॉक्सर आणि चार अधिकारी होते. यापूर्वी पाकिस्तानचा जलतरणपटू फैजान अकबर हा यावर्षी जूनमध्ये हंगेरीमध्ये पोहोचल्यानंतर बेपत्ता झाला होता.

22 वर्षीय, जो चार वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता आहे, बुडापेस्ट येथे 19 व्या FINA वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार होता. अकबरने आपल्या रूममेटला न सांगता बुडापेस्टमधील हॉटेलमधून चेक आऊट केले आणि तो परतला नाही, अशी माहीती मिळाली आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी विशेष नव्हती. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाकिस्तानने (Pakistan) दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आणि पदकतालिकेत 18 वे स्थान मिळविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

SCROLL FOR NEXT