Cricket
Cricket Canva
क्रीडा

Ranji Trophy: मुंबईविरुद्ध मॅच खेळण्यासाठी पोहचल्या बिहारच्या दोन टीम, पोलिसांनाही करावी लागली मध्यस्थी

Pranali Kodre

Ranji Trophy 2023-24, Bihar vs Mumbai:

रणजी ट्रॉफी 2024 स्पर्धेला शुक्रवारी (5 जानेवारी) सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी पटनामध्ये नाट्यमय घटना घडल्या. पटनाच्या मोईन-उल-हक स्टेडियमवर बिहार आणि मुंबई यांच्यात सामना होत आहे. मात्र, या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळाला जवळपास तब्बल २ तास उशीर झाला.

झाले असे की मुंबईविरुद्ध सामना खेळण्यासाठी शुक्रवारी सकाळी बिहारचे दोन संघ उपस्थितीत होते. बिहार क्रिकेट असोसिएशनमधील वादाचे पडसाद आता मैदानातही पोहचले. आहेत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही संघ बिहारचा अधिकृत संघ असल्याचा दावा करत होते. ज्यामुळे खेळ सुरु होण्याला उशीर तर झालाच, पण बिहार क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यामध्ये छोट्याप्रमाणात धक्काबुक्कीही झाली. या सर्व प्रकरणात स्थानिक पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. अखेर त्यानंतर साधारण 1 वाजता सामना सुरु झाला.

जे दोन संघ मैदानावर उपस्थित होते, त्यातील एक संघ बिहार क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी निवडला होता, तर दुसरा संघ सचिव अमित कुमार यांनी निवडला होता. विशेष म्हणजे दोन्ही संघात पूर्ण वेगळे खेळाडू होते. अखेर राकेश तिवारी यांनी निवडलेला संघ सामना खेळत आहे.

या गोंधळाबद्दल राकेश तिवारी आणि अमित कुमार या दोघांनीही इंडियन एक्सप्रेसकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तिवारी यांनी म्हटले की 'आम्ही खेळाडूंच्या योग्यतेनुसार संघाची निवड केली आहे. तुम्ही पाहा बिहारमधून प्रतिभाशाली खेळाडू येत आहेत. आमच्याकडे साकिब हुसैन नावाचा एक क्रिकेटपटू आहे, ज्याची आयपीएलमध्येही निवड झाली. आमच्याकडे 12 वर्षांच्या प्रतिभाशाली खेळाडू आहे, जो खेळात पदार्पणही करत आहे. दुसरा संघ निलंबित सचिव आहेत, त्यांनी निवडला आहे, त्यामुळे तो खोटा संघ आहे.'

यानंतर अमित कुमार यांनी सांगितले की 'पहिली गोष्ट ही की मी निवडणूक जिंकली आणि मी बिहार क्रिकेट असोसिएशनचा अधिकृत सचिव आहे. तुम्ही कोणत्याही सचिवाला निलंबित करू शकत नाही.'

'दुसरी गोष्ट कोणताही अध्यक्ष संघ कसा निवडू शकतो? तुम्ही कधी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना संघाची घोषणा करताना पाहिले आहे का? तुम्ही नेहमीच सचिव जय शाह यांची स्वाक्षरी पाहात.'

दरम्यान, नंतर बिहार क्रिकेट संघटनेने देखील एक प्रसिद्धीपत्रक नंतर जाहीर केले, ज्यात निलंबित सचिव अमित कुमार यांना गोंधळासाठी जबाबदार ठरवले आहे.

तसेच खोट्या संघासह येण्याबद्दल आणि बिहार क्रिकेट असोलिएशनचे ओएसडी मनोज कुमार यांना मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांच्याविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, या गोंधळाचा सामना संघाच्या कामगिरीवर झाला नाही. पहिल्या दिवसाखेर मुंबईने 9 बाद 235 धावा केल्या. बिहारकडून अनुभवी वीर प्रताप सिंगने 32 धावांत 4 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT