Travis Head 
क्रीडा

NZ vs AUS: दुखापतीनंतर कमबॅक, वर्ल्डकप पदार्पण अन् सेंच्यूरी! ट्रेविस हेडने रचले विक्रमांचे मनोरे

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Australia vs New Zealand, Travis Head Century Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी 27 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरू आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने काही विक्रमही केले आहेत.

खरंतर ट्रेविस हेडचा हा वनडे वर्ल्डकपमधील कारकिर्दीतील पहिलाच सामना होता. या सामन्यापूर्वी तो काही काळ दुखापतीमुळे संघातून बाहेर होता.

त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघासाठी यापूर्वी 14 खेळाडूच उपलब्ध होते. पण हेड दुखापतीतून पूर्ण बरा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाशी पुन्हा जोडला गेला. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी देण्यात आली.

दरम्यान, हेडनेही या संधीचा फायदा उचलला आणि पदार्पणाच्या वर्ल्डकप सामन्यात शतक ठोकलं. हेडने 25 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतरच्या 50 धावा त्याने 29 चेंडूत पूर्ण केल्या. त्यामुळे त्याने 59 चेंडूत हे शतक पूर्ण केले. त्याने 67 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारांसह 109 धावा केल्या.

त्यामुळे हेडचे हे शतक ऑस्ट्रेलियाकडून वनडेत चौथ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले आहे. या यादीत पहिल्या दोन्ही क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल आहे. त्याने गेल्याच सामन्यात म्हणजे दिल्लीमध्ये नेदरलँड्सविरुद्ध वर्ल्डकप 2023 मध्येच 40 चेंडूत शतक केले होते. हे वर्ल्डकपमधील देखील सर्वात जलद शतक ठरले.

तसेच 2015 वर्ल्डकपमध्येही सिडनीला मॅक्सवेलने श्रीलंकेविरुद्ध 51 चेंडूत शतक केले होते. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर जेम्स फॉकनरने 2013 साली बंगळुरूला 57 चेंडूत केलेले शतक आहे.

दिग्गजांमध्ये स्थान

दरम्यान, हेड हा वर्ल्डकप पदार्पणाच्या सामन्यामध्ये सर्वात जलद शतक करणाराही खेळाडू ठरला आहे. तसेच तो वर्ल्डकप पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून शतक करणारा पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी ट्रेवर चॅपेल, गॉफ मार्श, अँड्र्यू सायमंड्स आणि ऍरॉन फिंच यांनी असा कारनामा केला आहे.

  • ऑस्ट्रेलियाकडून वनडे वर्ल्डकप पदार्पणामध्ये शतक करणारे क्रिकेटपटू

    • 110 धावा - ट्रेवर चॅपेल, (वि. भारत, नॉटिंघम, 1983)

    • 110 धावा - गॉफ मार्श (वि. भारत, चेन्नई, 1987)

    • 143 धावा - अँड्र्यू सायमंड्स (वि. पाकिस्तान, जोहान्सबर्ग, 2003)

    • 135 धावा - ऍरॉन फिंच (वि. इंग्लंड, मेलबर्न, 2015)

    • 109 धावा ट्रेविस हेड (वि. न्यूझीलंड, धमरशाला, 2023)

वॉर्नरबरोबर भागीदारीतही विक्रम

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर हेडसह डेव्हिड वॉर्नरनेही शानदार खेळी केली. त्याने 65 चेंडूत 81 धावांची खेळी केली. तसेच हेड आणि वॉर्नर यांच्यात 175 धावांची सलामी भागीदारीही झाली. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये ही ऑस्ट्रेलियासाठी चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर वॉर्नर आणि मिचेल मार्श यांची जोडी आहे. या जोडीने वर्ल्डकप 2023 मध्येच पाकिस्तानविरुद्ध बंगळुरूला 259 धावांची भागीदारी केली होती.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांची जोडी आहे. त्यांनी 2011 वर्ल्डकपमध्ये बंगळुरूलाच कॅनडाविरुद्ध 183 धावांची भागीदारी केली होती.

त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर रिक मॅककॉस्कर आणि ऍलन टर्नर यांची जोडी असून त्यांनी 1975 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध 182 धावांची भागीदारी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT