Tom Blundell
Tom Blundell Dainik Gomantak
क्रीडा

England vs New Zealand: कसोटी क्रिकेटमध्ये 'या' स्टार फलंदाजाने पहिल्यांदाच केला मोठा रेकॉर्ड, ऋषभ पंतही...

Manish Jadhav

England vs New Zealand 2nd Test: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलने शानदार खेळी केली. त्याने एक मोठा विक्रम केला, जो ऋषभ पंतलाही करता आला नाही.

टॉमच्या खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ 300 हून अधिक धावा करु शकला आहे. त्याने आपल्या धडाकेबाज खेळीने सर्वांची मने जिंकली. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या या मोठ्या विक्रमाबद्दल...

टॉम ब्लंडेलने हा विक्रम केला

इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. जेव्हा विस्फोटक सलामीवीर टॉम लॅथम अवघी एक धाव काढून बाद झाला. यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि टॉम ब्लंडेल यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली.

टॉमने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत शानदार शतक झळकावले. त्याने 138 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 306 धावा करु शकला. या मोठी खेळी खेळण्यासोबतच टॉम ब्लंडेल डे-नाईट कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. भारताकडून ऋषभ पंतला (Rishabh Pant) अद्याप ही कामगिरी करता आलेली नाही.

किवी संघाने अनेक सामने जिंकले

टॉम ब्लंडेलने न्यूझीलंडकडून 22 कसोटी सामन्यांमध्ये चार शतके झळकावत 1364 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 2 एकदिवसीय सामन्यात 31 धावा आणि 7 टी-20 सामन्यात 59 धावा केल्या. मोठ्या खेळी खेळण्यात तो माहीर आहे. वयाच्या 32 व्या वर्षीही त्याचे विकेटकीपिंग कौशल्य अप्रतिम आहे. न्यूझीलंडकडून अंडर-19 विश्वचषकातही तो सहभागी झाला आहे.

इंग्लंडने मोठी धावसंख्या केली

इंग्लंडकडून बेन डक्ट आणि हॅरी ब्रूक यांनी शानदार खेळी खेळली. इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावा केल्या. किवी संघाकडून न्यूझीलंडच्या नील वेगरने 4 बळी घेतले. टीम साऊदीने 2 बळी घेतले. त्याचवेळी, न्यूझीलंडने पहिल्या डावात 306 धावा केल्या. किवी संघाकडून टॉम ब्लंडेलने 138 धावा, डेव्हॉन कॉनवेने 77 धावा, नील वॅगनरने 27 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT