Tokyo Olympics winner Ravi Dahiya receives unique gift from Delhi government Dainik Gomantak
क्रीडा

Tokyo Olympics विजेता रवी दहियाचा दिल्ली सरकारकडून अनोखा सन्मान

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या रवी दहिया (Ravi Dahiya) यांचा सन्मान करण्यासाठी दिल्ली सरकारने एक अनोखा पुढाकार घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या रवी दहिया (Ravi Dahiya) यांचा सन्मान करण्यासाठी दिल्ली सरकारने (Delhi government) एक अनोखा पुढाकार घेतला आहे. दिल्लीच्या आदर्श नगरमध्ये असलेल्या शासकीय मुलांच्या शाळेचे नाव बदलून रवि दहिया बाल विद्यालय असे करण्यात आले आहे. रवी दहिया यांनी आपले शालेय शिक्षण दिल्लीच्या याच शासकीय शाळेतून पूर्ण केले आहे. (Tokyo Olympics winner Ravi Dahiya receives unique gift from Delhi government)

ऑलिम्पियन रवी दहिया यांचा सत्कार करताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) म्हणाले की, दिल्लीच्या सरकारी शाळेत शिकणारे रवी दहिया आज त्यांच्या कष्ट आणि समर्पणाने देशाचे युवा आयकॉन बनले आहेत. यावेळी बोलताना रवी दहिया म्हणाले की, हे ऑलिम्पिक पदक आणण्यात दिल्ली सरकारचे मोठे योगदान आहे. तो म्हणाला की दिल्ली सरकार त्याला तेव्हांपासून मदत करत आहे जेंव्हा त्याची ऑलिम्पिकसाठी निवडही झाली नव्हती.

रवी दहिया असेही म्हणाले की कोरोनाच्या वेळी सर्वत्र लॉकडाऊन असतानाही दिल्ली सरकारने माझे प्रशिक्षण थांबू दिले नाही. दिल्ली सरकारने मिशन एक्सलन्स अंतर्गत प्रशिक्षणादरम्यान रवी दहिया यांना प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि इतर क्रीडा उपकरणांसाठी मदत केली होती.

रवी दहिया यांचा सन्मान करताना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या शाळेतून बाहेर पडलेले मूल देशासाठी ऑलिम्पिक पदके घेऊन येत आहे. ते म्हणाले की, या शाळेत रवी दहिया यांचे एक मोठे पोर्ट्रेट देखील लावण्यात येईल जेणेकरून मुलांना प्रेरणा मिळेल, त्यांच्या स्वप्नांची कदर होईल आणि क्रीडा क्षेत्रात चांगले काम होईल. तसेच हे विद्यालय मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी देखील कार्य करेल.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, देशासाठी पदके जिंकण्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे खेळणे हा आपल्या शाळांमध्ये अभ्यास म्हणून मानला जात नाही. कल्पना करा की जर रवी दहियाच्या शिक्षकांनी त्याला शाळेत खेळण्याऐवजी इतिहास किंवा इतर विषयांचा अभ्यास करण्याचा आग्रह धरला असता तर कदाचित रवी दहिया आज इतिहास घडवू शकला नसता.

मनीष सिसोदिया म्हणाले की, पदके आणणाऱ्या खेळाडूंवर प्रत्येकजण बक्षिसांचा वर्षाव करतो, परंतु खेळाडू संघर्ष करत असताना दिल्ली सरकार खेळाडूंना मदत करत आहे. प्रशिक्षणादरम्यान खेळाडूंना मदत करून, दिल्ली सरकार त्यांना पदके जिंकण्यासाठी पात्र बनवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT