Theunis de Bruin Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs SA: 'या' क्रिकेटपटूच्या घरी येणार छोटा पाहुणा, कसोटी मालिका सोडून परतणार मायदेशी

Australia vs South Africa 3rd Test: दक्षिण आफ्रिकेच्या एका स्टार क्रिकेटरच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Australia vs South Africa 3rd Test: दक्षिण आफ्रिकेच्या एका स्टार क्रिकेटरच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या जन्मावेळी त्याला कुटुंबासोबत राहायचे असून तो कसोटी मालिका सोडून मायदेशी परतणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना 4 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.

ब्रुइन बाप होणार आहे

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज थ्युनिस डी ब्रुइन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. पहिल्या मुलाच्या जन्मासाठी तो घरी परतत आहे. रासी व्हॅन डर डुसेनच्या जागी दुसऱ्या कसोटीसाठी 30 वर्षीय फलंदाजाचा संघात समावेश करण्यात आला. मेलबर्नमध्ये (Melbourne) झालेल्या त्या सामन्यात त्याने 12 आणि 28 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने हा सामना एक डाव आणि 182 धावांनी गमावला.

CSA ने अपडेट दिले

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने शनिवारी ट्विट करत म्हटले की, 'थ्युनिस डी ब्रुइन दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. पहिल्या मुलाच्या जन्मासाठी तो घरी परतत आहे. आम्ही त्याला शुभेच्छा देतो.'

क्लासेनला संधी मिळू शकते

डी ब्रुइनच्या अनुपस्थितीचा अर्थ असा आहे की, व्हॅन डेर ड्यूसेन किंवा हेनरिक क्लासेन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. क्लासेनने आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे आणि तो यष्टिरक्षणही करतो. याशिवाय, त्याने 30 एकदिवसीय आणि 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने याआधीच दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT