Morocco vs Croatia Dainik Gomantak
क्रीडा

Morocco vs Croatia: आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला मिळणार 220 कोटी रूपयांचे बक्षीस

तिसऱ्या स्थानासाठी क्रोएशिया-मोरोक्को भिडणार, फ्रान्स-अर्जेंटिना संघात रविवारी महामुकाबला

Akshay Nirmale

Morocco vs Croatia: फिफा फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज या स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी मोरक्को विरूद्ध क्रोएशिया या संघांमध्ये लढत होणार आहे. विशेष म्हणजे, फिफाकडून या स्पर्धेतील सहभागी संघांवर बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात जो विजेता ठरेल त्या संघाला तब्बल 220 कोटी रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. आज, शनिवारी (17 डिसेंबर) रोजी रात्री साडे आठ वाजता या सामन्यास सुरवात होईल.

(FIFA World Cup 2022)

क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचचा हा शेवटचा विश्वचषक सामना असेल. त्याला यंदाच्या स्पर्धेत एकही गोल करता आलेला नाही. मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या मॉड्रिचला त्याच्या शेवटच्या विश्वचषक सामन्यात गोल करायला आवडेल. मॉड्रिचशिवाय सर्वांच्या नजरा डोमोनिक आणि आंद्रेज क्रमारिच यांच्यावर असतील. हे खेळाडू 24 वर्षांनंतर क्रोएशियाला तिसऱ्या स्थानावर नेऊ शकतात. या संघाने यापूर्वी 1998 मध्ये तिसरे स्थान पटकावले होते.

मोरक्कन संघ प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला असून हा संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करत आहे. बोनो, अश्रफ हकीमी आणि रोमेन सॅस मोरोक्कोसाठी चमत्कार करू शकतात. बोनोने आपल्या संघासाठी अनेक गोल वाचवले असून या सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. 24 वर्षीय हकीमीने विरोधी संघांनाही गोल करण्यापासून रोखले आहे. मोरोक्कनचा कर्णधार रोमेन हा बचावपटू आहे पण या विश्वचषकात त्याने एक गोल केला आहे. फिफा क्रमवारीत क्रोएशियाचा संघ 12 व्या आणि मोरोक्को 22 व्या स्थानावर आहे, मात्र या विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी जवळपास सारखीच आहे.

दरम्यान, उद्या, 18 डिसेंबर रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना होत आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन संघांमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठ वाजता या सामन्याला सुरवात होईल. या अंतिम सामन्यात स्पर्धेचा तो विजेता ठरेल त्या संघाला ३५० कोटी रूपयांचे बक्षिस कोटी रूपयांचे बक्षिस मिळेल.

फिफातर्फे या स्पर्धेसाठी सुमारे 3500 कोटी रूपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. यात विजेत्या संघाला 350 कोटी रूपयांचे बक्षीस मिळेल. तर उपविजेत्या संघाला सुमारे 350 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. तिसऱ्या तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघाला सुमारे 220 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला 204 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. 5 व्या ते 8 व्या स्थानावर असलेल्या संघांना सुमारे 138 कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. 9 व्या ते 16 व्या क्रमांकावर असलेल्या संघांना सुमारे 106 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल आणि 17 व्या ते 32 व्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना सुमारे 74 कोटी रुपये मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT