Shreyas Gopal
Shreyas Gopal Dainik Gomantak
क्रीडा

'या' भारतीय क्रिकेटरची बायको दोन कंपन्यांची मालकीण !

दैनिक गोमन्तक

भारताचा (India) अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाल (Shreyas Gopal) विवाहबंधनात अडकला आहे. त्याने 24 नोव्हेंबर रोजी त्याची मैत्रीण निकितासोबत लग्न केले आहे. श्रेयस गोपालने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्नाची माहिती दिली. दोघांची काही महिन्यांपूर्वीच एंगेजमेंट झाली होती. श्रेयस गोपाल देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळतो. तो आत्तापर्यंत आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) भाग होता. बराच काळासून तो या संघाकडून खेळत आहे.

श्रेयस गोपालची पत्नी निकिता शिव एक व्यापारी असून ती स्वतःची कंपनी चालवते. त्या माना नेटवर्क कंपनीच्या सीईओ आहेत. यासोबतच तिने बार एपिसोड्स नावाची इव्हेंट सेवाही सुरु केली आहे. तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर सांगितले की, लुई फिलिप कंपनीची रणनीती आणि मार्केटिंगचे कामही मी पाहते. लग्नाची माहिती देताना, श्रेयस गोपालने लग्नाची तारीख 24 नोव्हेंबर 2021 दिली आहे. तसेच निक्कीनेही यास होकार दिला आहे. यावेळी त्याने पत्नीलाही टॅग केले.

दरम्यान, लग्नात श्रेयस गोपाल आणि निकिताचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. तसे, मयंक अग्रवाल, प्रसिद्ध कृष्णा, कृष्णप्पा गौतम सारखे क्रिकेटर सध्या टीम इंडियासोबत आहेत. मात्र ते सहभागी होऊ शकले नाहीत. श्रेयस गोपाल बऱ्याच काळापासून कर्नाटक संघाचा भाग आहे. तसेच, तो बऱ्याच काळापासून आयपीएल खेळत आहे. तो लेगस्पिनर गोलंदाजी करतो आणि तो इंडिया ए टीम संघाचाही भाग राहिलेला आहे. 28 वर्षीय श्रेयस गोपाल अद्याप भारतीय संघात खेळू शकलेला नाही. त्याने 64 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 2674 धावा केल्या आहेत तर 191 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 47 लिस्ट ए मॅचमध्ये 77 विकेट्स आणि 82 टी-20 मॅचमध्ये 91 विकेट घेतल्या आहेत.

तसेच, श्रेयस गोपालने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. सध्या तो प्रामुख्याने लेगस्पिनर आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्ससह मुंबई इंडियन्स संघाचाही भाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT