Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Panaji News : भाजप अल्पसंख्याकविरोधी असल्याचा विरोधकांकडून खोटा प्रचार
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, भाजप अल्पसंख्याकाच्या विरोधात असल्याचा खोटा प्रचार करत काँग्रेसने केवळ मतपेटीचे राजकारण केले, मात्र प्रत्यक्षात अल्पसंख्य समाजाला विकासापासून वंचित ठेवले. भाजपने नागरिकांसाठी कोणताही भेदभाव न करता विविध योजना राबवल्या आहेत.

भाजपा अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही म्हणूनच अनेक अल्पसंख्य नेते आज भाजपासोबत आहेत. प्रचारावेळी अनेक नागरिक उघडपणे भाजपाला पाठिंबा देत आहेत तर काही जण मूक मतदानाद्वारे आम्ही भाजपाला आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची ग्वाही देत असल्याची माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

येथे भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे माध्यम विभागाचे प्रभारी प्रेमानंद म्हांबरे आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक होते.

सुमारे ८० टक्के हिंदूबहुल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मी करत आहे, यातच भाजपचा धर्मनिरपेक्षपणा येतो. मी काँग्रेसमध्ये असतानाही नरेंद्र मोदींचा चाहता होतो. आज जागतिक स्तरावर मान असलेले मोदी यांना गोव्याबद्दल आस्था आहे.

येत्या लोकसभेत गोव्यातील दोन खासदार नक्की असणार याच शंका नाही. पंतप्रधानांकडून गोव्यासाठी केंद्रीय मंत्रि‍पदाच्या रुपात विशेष बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या काळात अनेक प्रकल्पांच्या केवळ कोनशिलाच बसवण्यात आल्या आणि प्रत्यक्षात कामे झालीच नाही. या कोनशिलांचा वापर करून एखादा प्रकल्प उभारला जाऊ शकतो,

असेही गुदिन्हो म्हणाले.

भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण गोव्यात येऊन गेले. गृहमंत्री अमित शहा उद्या उत्तर गोव्यात येत आहेत. काँग्रेसचा मात्र एकही मोठा नेता गोव्यात आलेला नाही. यावरून ते गोव्याला किती महत्त्व देतात हे दिसून येते, असे ते म्हणाले.

मुस्लिम विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तिप्पट

भाजपच्या गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहता मुस्लिम विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती तिप्पट झाली आहे,असे माविन गुदिन्हो म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी साऊदी अरेबियाशी चर्चा करून भारतातून धार्मिक पर्यटन करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठीचा कोटा तिपटीने वाढवून घेतला आहे.

Panaji
Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

स्व.मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना जुने गोवे येथील शवप्रदर्शन सोहळ्यावेळी जागतिक दर्जाची व्यवस्था उपलब्ध केली होती. आताही उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शवप्रदर्शन सोहळ्यात चोख व्यवस्था आणि सुविधांसाठी ७१ कोटींची कामे निश्चित केलेली आहेत.

ओसीआय कार्डप्रश्नी केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे विदेशात असलेल्या गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे. दुहेरी नागरिकत्वाच्या विषयावर सुद्धा योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल,असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com