Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Labor Day 2024 : याप्रसंगी स्ट्रीट प्रोविडन्सचे डॉनाल्ड फर्नांडिस, निवृत्त पोलिस अधिकारी बॉस्को जॉर्ज, एल्विस गोम्स, सावियो कुतिन्हो डॉ. रोसलीन परेरा, ॲड. नीक कुलासो, रॉबर्ट वाझ, लालन पार्सेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Labor Day
Labor DayDainik Gomantak

Labor Day 2024 :

सासष्टी, कामगार दिनानिमित्त ‘स्ट्रीट प्रोविडन्स’ने नवतारा हॉटेल व शॅडो कौन्सिलच्या सहकार्याने काल मडगाव नगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना दुपारचे जेवण (लंच पॅकेट्स) दिले.

याप्रसंगी स्ट्रीट प्रोविडन्सचे डॉनाल्ड फर्नांडिस, निवृत्त पोलिस अधिकारी बॉस्को जॉर्ज, एल्विस गोम्स, सावियो कुतिन्हो डॉ. रोसलीन परेरा, ॲड. नीक कुलासो, रॉबर्ट वाझ, लालन पार्सेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कामगार समाजासाठी स्वतः परिश्रम घेऊन कार्य करीत असतात. कचरा गोळा करणारे कामगार तर आपल्या आरोग्याची तमा न बाळगता परिसरात स्वच्छता राखत असतात.

Labor Day
Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

मात्र, मडगाव नगरपालिकेने गेल्या दहा वर्षांत अशा शेकडो कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी काहीच केलेले नाही, असे सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

याप्रसंगी बॉस्को जॉर्ज व एल्विस गोम्स यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यांनी या उपक्रमाबद्दल स्ट्रीट प्रोविडन्सचे कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com