गोव्यातील (Goa) युवा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना येथील गुणवत्तेची जाणीव झाल्याचे निरीक्षण प्रशिक्षक उत्सव मिश्रा (Utsav Mishra) यांनी नोंदविले. Dainik Gomantak
क्रीडा

राष्ट्रीय श्रेणी प्रशिक्षकांचे बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन

गोव्यातील युवा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना येथील गुणवत्तेची जाणीव झाल्याचे निरीक्षण प्रशिक्षक उत्सव मिश्रा (Utsav Mishra) यांनी नोंदविले. गोव्यातील बॅडमिंटन (Goa Badminton) सुविधा अप्रतिम असल्या, तरी येथे हॉस्टेल सुविधा अनुपलब्ध आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा बॅडमिंटन असोसिएशनने (Goa Badminton Association) राज्यातील बॅडमिंटनपटूंसाठी घेतलेल्या दोन दिवसीय बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय श्रेणी प्रशिक्षक उत्सव मिश्रा (Utsav Mishra) यांनी मार्गदर्शन केले. कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या शिबिरात सुमारे 35 प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला.

शिबिर गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने घेण्यात आले होते. मिश्रा यांना शिबिरात गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे प्रशिक्षक घोश महंमद नदाफ, श्रीधर गोसावी व अवधूत सप्तोजी यांचे मार्गदर्शन लाभले. ‘‘भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्सव मिश्रा यांचा अनुभवाचा दोन दिवसीय शिबिरात प्रशिक्षणार्थींना छान लाभ झाला. या कालावधीत मिश्रा यांनी खेळाडूंना त्यांच्या मर्यादा आणि क्षमतेची जाणीव करून दिली. ठराविक कालावधीत बाहेरगावच्या अनुभवी प्रशिक्षकांना आमंत्रित करून आणखी शिबिर घेण्याचे आमचे नियोजन आहे, जेणेकरून आमच्या खेळाडूंची प्रगती साधली जाईल,’’ असे सांगत गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी शिबिराचा हेतू स्पष्ट केला. शिबिराच्या समारोप सोहळ्यास गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूरही उपस्थित होते.

गोमंतकीयांतील गुणवत्तेची जाणीव

गोव्यातील युवा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना येथील गुणवत्तेची जाणीव झाल्याचे निरीक्षण प्रशिक्षक उत्सव मिश्रा यांनी नोंदविले. गोव्यातील बॅडमिंटन सुविधा अप्रतिम असल्या, तरी येथे हॉस्टेल सुविधा अनुपलब्ध आहेत आणि त्याची अत्यावश्यकता आहे. अकादमीत चांगले खेळाडू विविध भागातून येतात. हे खेळाड एकमेकांना खेळताना पाहत शिकतात. खेळाडूच्या स्पर्धात्मक विकासासाठी समर्पित प्रशिक्षण सत्र गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT