Indian cricket teams Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: भारतीय महिला संघ पुन्हा एकदा करणार इंग्लंड दौरा, वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट संघांचा (Indian Cricket Team) 2021 प्रमाणेच 2022 मध्ये इंग्लंड दौरा निश्चित करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघांचा (Indian Cricket Team) 2021 प्रमाणेच 2022 मध्ये इंग्लंड दौरा निश्चित करण्यात आला आहे. भारतीय पुरुष संघाचा इंग्लंड दौरा आधीच जाहीर झाला आहे. आता महिला संघाच्या दौऱ्याचीही माहिती समोर आली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ तीन एकदिवसीय आणि तितक्याच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाईल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) मंगळवारी ही घोषणा केली. (The Indian Womens Team Will Once Again Tour England)

भारत आणि इंग्लंड यांच्यात 10 सप्टेंबरपासून तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. टी-20 मालिकेनंतर (T-20 Series) वनडे मालिका 18 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. अंतिम वनडे ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा सुमारे 14 महिन्यांतच दुसरा इंग्लंड (England) दौरा आहे. यापूर्वी जून-जुलै 2021 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. त्यानंतर टीम इंडियाने (Team India) एक कसोटी, 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली होती. त्यामध्ये कसोटी सामना अनिर्णित राहिला, तर एकदिवसीय आणि टी-20 मालिकेवर इंग्लंडने विजय संपादन केला होता.

मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे: 1ली T20I: 10 सप्टेंबर (डरहम); 2रा T20: 13 सप्टेंबर (डर्बी); तिसरा T20: 15 सप्टेंबर (ब्रिस्टल). पहिली वनडे: 18 सप्टेंबर (होव्ह); दुसरी वनडे: 21 सप्टेंबर (कँटरबरी); तिसरी वनडे: 24 सप्टेंबर (लॉर्ड्स, लंडन)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Almo Mountain Wild Mushrooms: अळिंबांची भूमी असलेला 'अळमो डोंगर' हरवून बसलाय ओळख

CWG 2026: नीरज चोप्राकडून 'सुवर्णपदका'ची अपेक्षा; भालाफेक अंतिम सामना कधी, किती वाजता अन् कुठे पाहता येईल? जाणून घ्या

खरी कुजबूज: फातोर्ड्यातील 'पॉलिटिक्स'

Cape Bicholim Cow Transport: गुरांच्या निर्दयी स्थलांतराच्या व्हिडिओवर उच्चन्यायालयाची दखल; ध्यान फाउंडेशनला अंतरिम दिलासा नाकारला

Horoscope: श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी 'या' राशींवर भोलेनाथांची विशेष कृपा! नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात यशाचे योग

SCROLL FOR NEXT