Australia Dainik Gomantak
क्रीडा

WWC च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना! भारत अन् ऑस्ट्रेलिया बनले साक्षीदार

भारत-ऑस्ट्रेलिया (Australia) सामन्यात 3 शतकी भागीदारी पाहायला मिळाली.

दैनिक गोमन्तक

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अनेक अर्थांनी खास होता. परंतु, या सामन्यात एक गोष्ट अशी घडली जी महिला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाली. वास्तविक भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील (Australia) सामन्यात 3 शतकी भागीदारी पाहायला मिळाली. महिला विश्वचषकात (Women's World Cup) यापूर्वी कोणत्याही सामन्यात असे घडले नव्हते. यापैकी 2 भागीदारी विजयाच्या प्रतिक ठरल्या, तर एक शतकी भागीदारी पराभवाचे कारण बनली. (The India-Australia match saw a 3 century partnership)

दरम्यान, पहिल्यांदा विजयी भागीदारीबद्दल बोलूया. रॅचेल हेन्स आणि अ‍ॅलिसा हिली यांच्यातील शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला गेला. या दोघींमध्ये 117 चेंडूत 121 धावांची भागीदारी झाली. याशिवाय विजयामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) आणि एलिस पेरी (Alice Perry) यांनी शानदार फलंदाजी करत शतकी भागीदारी उभारली. या दोघींनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 123 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली.

तसेच, या सामन्यात भारताकडूनही शतकी भागीदारी झाली. मात्र, ती भागीदारी विजयाची साक्षीदार होऊ शकली नाही. त्यांनी भारताची धावसंख्या 277 धावांपर्यंत नेली. परंतु, ऑस्ट्रेलियाने या लक्ष्याचा पाठलाग केला. भारतासाठी मिताली राज (Mithali Raj) आणि यस्तिका भाटिया यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ही भागीदारी झाली. दोघींनी मिळून 154 चेंडूत 130 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT