fourth ISL final in Fatorda Dainik gomantak
क्रीडा

फातोर्ड्यात चौथ्यांदा आयएसएल अंतिम लढत, 20 मार्चला रंगणार सामना

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यंदा ‘अवे गोल’ नियम नसेल

दैनिक गोमन्तक

पणजी ः इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात येत्या 20 मार्च रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर चौथ्यांदा अंतिम सामना खेळला जाईल. सर्वाधिक वेळा विजेतेपदासाठी लढत होणारे हे एकमेव केंद्र ठरले आहे.

आयएसएल (ISL) स्पर्धेचा आठवा मोसम सध्या गोव्यात सुरू आहे. स्पर्धेच्या उपांत्य व अंतिम फेरीचे वेळापत्रक स्पर्धेचे आयोजक फुटबॉल (Football)  स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेडने (एफएसडीएल) गुरुवारी जाहीर केले. स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना 7 मार्च रोजी होईल. साखळी फेरीतील अव्वल संघ लीग शिल्ड विजेता ठरेल व त्यांना पुढील मोसमातील एएफसी चँपियन्स लीग स्पर्धसाठी थेट प्रवेश मिळेल.

उपांत्य फेरी (प्ले-ऑफ) दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यातील सामने अनुक्रमे 11 व 12 मार्च रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील सामने 15 व 16 मार्च रोजी होतील. स्पर्धेतील 11 संघांपैकी पहिले चार संघ प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यंदा ‘अवे गोल’ नियम नसेल. दोन्ही टप्प्यातील लढतीनंतर अंतिम फेरीतील प्रवेशासाठी संघांच्या गोलफरकास प्राधान्य दिले जाईल.

फातोर्डा (Fatorda) येथील आयएसएल अंतिम लढती

- 20 डिसेंबर 2015 चेन्नईयीन वि. वि. एफसी गोवा

- 14 मार्च 2020 एटीके वि. वि. चेन्नईयीन

- 13 मार्च 2021 मुंबई सिटी वि. वि. एटीके मोहन बागान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election: गोव्यात विरोधकांच्या आघाडीची जोरदार तयारी! काँग्रेसची 'आरजी', 'आप'सोबत दोन दिवसांत चर्चा; गोवा फॉरवर्डशीही बोलणी करण्याचे चोडणकरांचे संकेत

Viral Post: 379 रुपयांचं जेवण मागवलं अन् 1,166 रुपयांचं बिल आलं! डिलिव्हरी चार्ज पाहून ग्राहक हैराण, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Goa Politics: काँग्रेसचे 'तिकीट' विक्रीसाठी? नुवेच्या उमेदवारीवरून भाजपचा थेट सवाल; कार्यालयाच्या जागेच्या व्यवहाराबाबत मागितला खुलासा

September 1 Rule Change: 1 सप्टेंबरपासून देशात 7 मोठे बदल! एलपीजी, विमान प्रवास, बँक एफडी आणि कार खरेदीवर होणार थेट परिणाम

Goa Assembly Election: 'मगो'च्या सर्वेक्षणावर भाजपचे मौन! फोंड्यानंतर साखळीसह 12 मतदारसंघांवर दावा

SCROLL FOR NEXT