मुख्य प्रशिक्षकाची (Head coach) भूमिका बजावण्यासाठी पुन्हा एकदा बीसीसीआय (BCCI) अनिल कुंबळेशी (Anil Kumble) संपर्क साधण्याच्या तयारीत आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Viratच्या अडचणी वाढणार, BCCI अनिल कुंबळेंना पुन्हा प्रशिक्षक करण्याच्या तयारीत?

सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसी नंतर अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना पुन्हा भारतीय प्रशिक्षक (Indian coach) म्हणून आणण्याची चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अडचणीत कमी होताना दिसत नाहीत. पुढील महिन्यात विश्वचषक टी -20 नंतर रवी शास्त्री (Ravi Shastri), गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) आणि फील्डिंग कोच आर श्रीधरचा (R Sridhar) कार्यकाल संपणार आहे. आता मुख्य प्रशिक्षकाची (Head coach) भूमिका बजावण्यासाठी पुन्हा एकदा बीसीसीआय (BCCI) अनिल कुंबळेशी (Anil Kumble) संपर्क साधण्याच्या तयारीत आहे. कुंबळे यांचे कोहलीशी झालेल्या मतभेदानंतर माजी कर्णधार आणि महान लेग स्पिनर कुंबळे यांनी 2017 मध्ये प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची BCCI ने टी -20 विश्वचषकसाठी मेंटर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतरच विराट कोहली टी -20चे कर्णधारपद देखील सोडणार आहे. तो एकदिवसीय व कसोटी सामने संघाचा कर्णधार असेल.

चार वर्षांपूर्वी अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर, विराट कोहली आणि बीसीसीआयने त्यावेळचे सीएजी विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील समितीतून नवीन प्रशिक्षक म्हणून संघ शास्त्री यांची शिफारस करण्यात आली. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसी नंतर अनिल कुंबळे यांना पुन्हा भारतीय प्रशिक्षक म्हणून आणण्याची चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीआयला संघासाठी एका नवीन प्रशिक्षकाची आवश्यकता असल्याचे वाटत आहे. कोहलीने निर्णय झाल्यानंतर, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बोलताना सांगितले की भारतीय क्रिकेट मंडळाकडे टीम इंडियाबाबत स्पष्ट आराखडा तयार आहे.

अनिल कुंबळे 2017 मध्ये विराट कोहलीबरोबर झालेल्या मतभेदानंतरही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहीले. त्यावेळी गांगुली बीसीसीआयच्या क्रिकेट सुधारणा समितीचे सदस्य होते. अनिल कुंबळे यांची जून 2016 मध्ये प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. भारत 2017 आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. परंतु अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागत होता. कुंबळे सध्या आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहे. अनिल कुंबळे यांना संपर्क साधण्यापूर्वी, बीसीसीआयने श्रीलंकेचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक, महेला जयवर्धने यांच्याही देखील संपर्क साधला.

मात्र, श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांना श्रीलंकेचा संघ आणि आयपीएल फ्रँचायझीसाठी प्रशिक्षण द्यायचे आहे. त्यामुळे त्यांची भारतीय संघाचे प्रशिक्षकपदासाठी नेमणूक होऊ शकत नाही. बीसीसीआयच्या नवीन नियमांच्या मते, कोणत्याही व्यक्तीला एका वेळी दोन पोस्टवर राहण्याची अनुमती नाही.

अनिल कुंबळे यांना बोर्डावर यायचे असेल तर, त्यांना आयपीएलचे प्रशिक्षकपद सोडून द्यावे लागणार आहे. कुंबळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचे प्रमुख देखील आहेत.जेव्हा कुंबळे यांची प्रथम 2016 मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु काही दिवसांनी, कोहली आणि कुंबळे यांच्यात वादाला सुरुवात झाली. कुंबळेंनी आपल्या राजीनाम्यात कोहलीने त्यांच्या शैलीवर घेण्यात आलेल्या अक्षेपामुळे आश्चर्यही व्यक्त केले होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमींमध्ये उत्साह, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: पणजीतील दिवजा सर्कल येथे कार आणि दुचाकीमध्ये अपघात

SCROLL FOR NEXT