Football Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवा बंगळूरच्या बचावावर दबाव!

शनिवारी या दोन्ही संघांत बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर लढत होईल, त्यावेळी साहजिकच बचावावर लक्ष केंद्रित असेल.

दैनिक गोमन्तक

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत एफसी गोवा, तसेच बंगळूर एफसी या दोन्ही संघांच्या बचावफळीस दबाव झेलता आलेला नाही. परिणामी त्यांची कामगिरी उंचावू शकली नाही व गोलही मोठ्या प्रमाणात स्वीकारावे लागले. शनिवारी या दोन्ही संघांत बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर लढत होईल, त्यावेळी साहजिकच बचावावर लक्ष केंद्रित असेल.

एफसी गोवाने चार लढतीत 11, तर बंगळूर (Bangalore) एफसीने पाच लढतीत 10 गोल स्वीकारले आहेत. शनिवारी दोन्ही संघांना दक्ष राहावे लागेल. एफसी गोवाने सलग तीन पराभवानंतर मागील लढतीत ईस्ट बंगालला (Bengal) 4-3 फरकाने हरवून प्रथमच गुण प्राप्त केले. त्यांच्या खाती आता तीन गुण आहेत. बंगळूरचीही कामगिरी उठावदार नाही. पहिल्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडला 4-2 फरकाने हरविल्यानंतर बंगळूरने मागील तीन लढतीत फक्त एक गुण मिळविला आहे. त्यांच्या खाती सध्या चार गुण आहेत. बंगळूरला मागील दोन लढतीत अनुक्रमे मुंबई सिटी (1-3) व हैदराबाद (0-1) संघाकडून हार पत्करावी लागली.

‘‘प्रत्येक सामन्यागणिक आमचा खेळ उंचावत आहे. मात्र, पुढील प्रत्येक सामन्यात आम्हाला बचावावर अधिक मेहनत घ्यावी लागेल. आम्ही सहज गोल स्वीकारले आहेत. सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी ते बाधक ठरत आहे,’’ असे बंगळूर एफसीचे प्रशिक्षक मार्को पेझाइयोली यांनी सांगितले. ‘‘माझ्यासाठी संघाकडून शंभर टक्के एकाग्रता महत्त्वाची आहे. आम्ही सेटपिसेसवर जास्त गोल स्वीकारलेत. अशा परिस्थितीत खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणे गरजेचे आहे. तरीही बचाव हाच मुख्य मुद्दा नाही. सर्व खेळाडूंनी आक्रमण आणि बचावाची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्या दृष्टीने खेळाडू मेहनत घेत आहेत,’’ असे एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो म्हणाले. संघातील नवा परदेशी खेळाडू ऐराम काब्रेरा, अनुभवी गोमंतकीय मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस यांच्या दुखापतीची चिंता असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोलच्या प्रतीक्षेत छेत्री

बंगळूर एफसीचा कर्णधार सुनील छेत्रीसाठी एफसी गोवाविरुद्धची लढत संस्मरणीय असेल. तो खेळल्यास, ती त्याची शंभरावी आयएसएल लढत ठरेल. मात्र मागील पाच लढतीत या हुकमी आघाडीपटूस गोल नोंदविता आलेला नाही. 47 गोलसह तो आयएसएल गोल मानकऱ्यांत दुसऱ्या स्थानी आहे. शनिवारी गोल केल्यास तो फेरान कोरोमिनास (48 गोल) याला गाठू शकेल.

विजयामुळे आत्मविश्वास उंचावला : नोगेरा

एफसी गोवाने तीन पराभवानंतर मागील लढतीत विजय मिळविला, त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावल्याचे मत एफसी गोवाचा स्पॅनिश मध्यरक्षक आर्ल्बेर्टो नोगेरा याने व्यक्त केले. ईस्ट बंगालला एफसी गोवाने 4-3 फरकाने हरविले, त्या विजयात नोगेरा याने दोन गोल नोंदविले. त्याने स्वतःच्या कामगिरीबद्दलही आनंद व्यक्त केला.

लढतीपूर्वी...

- एफसी गोवाचे 4 लढतीत 1 विजय, 3 पराभव, 3 गुण, 6 गोल नोंदविले, 11 गोल स्वीकारले

- बंगळूर एफसीचे 5 लढतीत 1 विजय, 1 बरोबरी, 3 पराभव, 4 गुण, 7 गोल नोंदविले, 10 गोल स्वीकारले

- बंगळूरचे मागील 2 लढतीत सलग पराभव

- एफसी गोवास 4, बंगळूरला 5 लढतीत क्लीन शीट राखण्यात अपयश

- आयएसएल स्पर्धेत 5 फेब्रुवारी 2021 नंतरच्या 9 लढतीत बंगळूरची क्लीन शीट नाही

- गतमोसमात उभय संघांत 22 नोव्हेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे 2-2 गोलबरोबरी

- 21 फेब्रुवारी 2021 रोजी फातोर्डा येथेच एफसी गोवाचा बंगळूरवर 2-1 फरकाने विजय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT