gadre gaspar open 2022 Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या तेजसला पाचव्या विजेतेपदाची संधी

गास्पार डायस टेनिस अंतिम लढतीत गतविजेत्या प्रणीतचे आव्हान

दैनिक गोमन्तक

पणजी ः गोव्याच्या तेजस शेवडे याला गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत पाचव्यांदा विजेतेपद मिळविण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्याला गतविजेता कर्नाटकचा प्रणीत वेणुगोपाळ याचे प्रबळ आव्हान मागे सारावे लागेल.

पुरुष एकेरीत गतवर्षीही प्रणीत आणि तेजस यांच्यात अंतिम लढत झाली होती, त्यावेळी स्नायू दुखावल्यामुळे तेजसला सामन्यातून माघार घ्यावी लागली होती व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यापूर्वी तेजसने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

स्पर्धेच्या (Competition) उपांत्य फेरीत मडगावस्थित तेजसने एकही गेम न गमावता सूरज बिक्कान्नावर याचा 6-0, 6-0 असा फडशा पाडला. दुसऱ्या उपांत्य लढतीत बंगळूरच्या (Bangalore) प्रणीतने आपल्याच शहरातील अँड्र्यू याला 6-1, 6-3 असे सरळ सेट्समध्ये नमविले.

पुरुषांच्या दुहेरीत काफिल कडवेकर व अश्विन नरसिंघानी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी अँड्र्यू व राजू जोडीवर 6-7, 6-3, 10-7 अशी मात केली. मिश्र दुहेरीत संतोष व मेलानी चौगुले यांनी अंतिम फेरी गाठताना आदर्श आणि बबिता अँथनी जोडीवर 7-6 (4), 6-2 असा विजय नोंदविला.

अखिलेश मुलांत विजेता

अखिलेश चव्हाण याने आदित्य जाधव याच्यावर 4-1, 4-3 (4) फरकाने विजय मिळवून 12 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत विजेतेपदाचा (Winner) किताब जिंकला. उपांत्य लढतीत अखिलेशने अरहान इनामदार याच्यावर 4-3, 3-4, 10-8 असा, तर आदित्यने कियान याच्या 4-0, 4-0 असा विजय मिळविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT