Gadre Gaspar Open 2022 Dainik Gomantak
क्रीडा

तेजस-ऑलिव्हिया, सूरज-प्रणीतची दुहेरीत बाजी

विजेतेपद मिळवत गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत पाडली छाप

पणजी : तेजस शेवडे आणि ऑलिव्हिया चौगुले यांनी मिश्र दुहेरीत, तर सूरज बिक्कान्नावर आणि प्रणीत वेणुगोपाळ यांनी पुरुष दुहेरीत विजेतेपद मिळवून गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत छाप पाडली.

स्पर्धेच्या दुहेरीतील अंतिम लढती मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस टेनिस (Tennis) कोर्टवर झाले. मिश्र दुहेरीत तेजस व ऑलिव्हिया जोडीने संतोष आणि मेलानी चौगुले जोडीवर एका गेमच्या मोबदल्यात 6-1, 6-0 अशी सरळ सेट्समध्ये मात केली. ऑलिव्हियाने यापूर्वीच 16 वर्षांखालील मुलींतही विजेतेपद मिळविले आहे. महिला एकेरीतील अंतिम लढतीतही खेळणार असल्याने तिला या स्पर्धेत तिहेरी किताबाची संधी आहे. तेजसने पुरुष एकेरीतही अंतिम फेरी गाठली आहे.

महिला एकेरीत ऑलिव्हिया हिच्यासमोर कोल्हापूरच्या (Kolhapur) रितिका डावलकर हिचे आव्हान असेल. उपांत्य लढतीत रितिकाने रिबेका जॉर्ज हिचा 6-0, 6-0 असा धुव्वा उडविला. रितिकाने 12 वर्षांखालील मुलींची अंतिम लढत यापूर्वीच जिंकली आहे. पुरुष एकेरीत तेजस व प्रणीत यांच्यात विजेतेपदासाठी चुरस आहे.

पुरुष दुहेरीतील अंतिम लढतीत प्रणीत वेणुगोपाळ व सूरज बिक्कान्नावर जोडीने काफिल कडवेकर आणि अश्विन नरसिंघानी जोडीवर चुरशीच्या लढतीत 4-6, 6-4, 10-7 असा विजय नोंदविला. त्यापूर्वी अश्विन याने 16 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत विजेतेपद (Winner) मिळवले होते. त्याने साईल गजिनकर याच्यावर 6-2, 6-0 असा विजय प्राप्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT