आय-लीग स्पर्धा Dainik Gomantak
क्रीडा

आय-लीगमध्ये संघ, सामन्यांच्या संख्येत वाढ

2021-22 मोसमातील आय-लीग स्पर्धेसाठी विशाखापट्टणम येथील श्रीनिधी फुटबॉल क्लबला थेट प्रवेश देण्यात आला आहे. या स्पर्धेत दहा संघ असतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत (I-League football tournament) सहभागी संघाची संख्या वाढल्याने सामनेही जास्त असतील. कोरोना विषाणू (Covid 19) महामारी पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांसह कोलकात्यात डिसेंबरपासून स्पर्धा घेण्याचे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (All India Football Federation) लीग कमिटीचे नियोजन आहे.

गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत 11 संघ होते. मणिपूरचा नेरोका एफसी संघ तळास राहिला होता, पण महामारीच्या कारणास्तव त्यांची पदावनती रोखण्यात आली. 2021-22 मोसमातील आय-लीग स्पर्धेसाठी विशाखापट्टणम येथील श्रीनिधी फुटबॉल क्लबला थेट प्रवेश देण्यात आला आहे, तर अन्य एक संघ पात्रता फेरीतील विजेता असेल. ही फेरी बंगळूरमध्ये येत्या सप्टेंबरमध्ये खेळविण्याचे नियोजन आहे. या स्पर्धेत दहा संघ असतील.

नव्या आय-लीग मोसमात 13 संघ भाग घेणार असल्याने सामने वाढले आहेत. त्यामुळे मोसमात 80 ऐवजी 114 सामने होतील. गतमोसमात आय-लीग स्पर्धा जैवसुरक्षा वातावरणात कोलकाता येथेच झाली होती. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळला, नंतर गुणतक्त्यातील क्रमवारीनुसार संघांची दोन गटात विभागणी झाली. यंदाही स्पर्धा याच पद्धतीने खेळली जाईल, अशी माहिती लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनंदो धर यांनी दिली. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात पहिला गट सात संघांचा असेल, त्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल. दुसऱ्या गटात सहा संघ असतील. हे संघ पदावनती टाळण्यासाठी खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT