क्रीडा

Team India: ठरलं तर! टी20 मालिकेसाठी ऑगस्टमध्ये भारतीय संघ करणार 'या' देशाचा दौरा

भारतीय संघाचे यावर्षीचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त दिसत असून आता ऑगस्टमध्येही संघ तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी संघ परदेशी दौरा करणार आहे.

Pranali Kodre

Team India will Travel to Ireland for T20I Series in August: भारतीय क्रिकेट संघाचे यावर्षीचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त दिसत आहे. आता आयर्लंड क्रिकेट बोर्डानेही घोषित केले आहे की भारतीय संघ ऑगस्ट 2023 मध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे.

भारताने गेल्यावर्षी देखील आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारताने 2 सामन्यांची टी20 मालिका खेळली होती. या मालिकेत भारताने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 2-0 असा विजय मिळवला होता.

त्यानंतर आता पुन्हा भारत आयर्लंडचा दौरा करणार आहे. याबद्दल आयर्लंड क्रिकेटने माहिती दिली की 'आयरिश क्रिकेट फॅन्स आता जागतिक टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. भारतीय संघ तीन सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी ऑगस्टमध्ये मालाहाईडला येणार आहे.'

ही मालिका 18 ते 23 ऑगस्टदरम्यान होण्याची शक्यता आहे. आता या मालिकेसाठी देखील बीसीसीआय हार्दिकला कर्णधार म्हणून दौऱ्यावर पाठवणार का, हे पाहावे लागेल. कारण त्यानंतर भारताला वनडे वर्ल्डकपदेखील खेळायचा आहे.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय कसोटी संघाला 7 ते 12 जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही, पण त्यानंतर आशिया चषक स्पर्धाही भारताला खेळायची आहे.

आयर्लंड करणार वर्ल्डकपला पात्र ठरण्यासाठी प्रयत्न

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी आयर्लंडला बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची वर्ल्ड कप सुपर लीगमधील अखेरची वनडे मालिका खेळायची आहे. ही मालिका मे महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे. ही मालिका आयर्लंडसाठी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये थेट पात्र ठरण्यासाठी महत्त्वाची आहे.

जर या मालिकेत आयर्लंडने 3-0 असा बांगलादेशाला व्हाईटवॉश दिला, तर आयर्लंड 2023 वनडे वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरतील. मात्र मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला, तर मात्र बांगलादेशला जूनमध्ये झिम्बाब्वेमध्ये जाऊन वर्ल्डकप क्वालिफायर स्पर्धा खेळावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीत मोठा भूकंप! राघव चड्ढांनी पक्षाला ठोकला रामराम; केजरीवालांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

"मुंबई क्राईम ब्रांचचं नाव वापरुन 61 लाखांची लूट!" मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून करायचा 'डिजिटल अरेस्ट'; अखेर गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील भामट्याला अटक

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

VIDEO: "मैदानावर क्रिकेट की कुस्ती?" मोहम्मद आमीरच्या स्लेजिंगवर भडकला फहीम अश्रफ, मारण्यासाठी उगारली बॅट; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT