Sanju Samson & Chahal & Bhuvneshwar Kumar Dainik Gomantak
क्रीडा

IND vs Aus T20 Series: पुन्हा घोर निराशा... टी-20 मालिकेसाठी संजू सॅमसनसह 'या' 5 खेळाडूंकडे सिलेक्टर्सचे दुर्लक्ष!

IND vs Aus: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, परंतु इथे आपण त्या खेळाडूंबद्दल बोलू ज्यांना संधी मिळाली नाही.

Manish Jadhav

IND vs Aus T20 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी सोमवारी (20 नोव्हेंबर) संध्याकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने भारतीय संघाची घोषणा केली.

निवड समितीने पहिल्या तीन सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघाची निवड केली असून, श्रेयस अय्यरही शेवटच्या दोन सामन्यांमध्ये उपकर्णधार म्हणून संघात सामील होणार आहे. या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, परंतु इथे आपण त्या खेळाडूंबद्दल बोलत आहोत ज्यांना संधी मिळाली नाही.

दरम्यान, 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी ज्या खेळाडूंना संधी मिळालेली नाही, त्यात यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन, अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार, लेगस्पिनर यजुवेंद्र चहल, अभिषेक शर्मा आणि रायन पराग यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर, विश्वचषक 2023 संघातून केवळ तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, ज्यात सूर्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि इशान किशन यांच्या नावांचा समावेश आहे. तर, श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यांमध्ये संघाचा भाग असेल.

दुसरीकडे, आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आणि त्यानंतर चीनमध्ये खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 2023 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवडकर्त्यांनी विश्वास दाखवला केला आहे.

यासोबतच ज्या खेळाडूंचे आयपीएलचे गेल्या दोन मोसमात चांगले प्रदर्शन झाले त्यांच्याकडेही लक्ष देण्यात आले आहे. त्याचवेळी, नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये सहभागी खेळाडूंना कामगिरीच्या आधारे संधी देण्यात आलेली नाही, ज्यात भुवनेश्वर, अभिषेक शर्मा आणि रायन पराग यांचा समावेश आहे.

तसेच, भुवनेश्वरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सात सामन्यांमध्ये 5.84 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने एकूण 16 विकेट घेतल्या होत्या, परंतु निवडकर्त्यांना वाटले की, त्याचा वेग लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. तो केवळ 130 किमी प्रतितासाच्या सरासरीने गोलंदाजी करतो.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुनही रियान पराग आणि अभिषेक शर्मा बाहेर आहेत. आसामकडून खेळणारा पराग या स्पर्धेत 10 सामन्यांत 510 धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, ज्यामध्ये 182 च्या स्ट्राइक रेटने सात अर्धशतकांचा समावेश होता.

दुसरीकडे, पंजाबचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा, जो उपयुक्त डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 192 च्या स्ट्राइक-रेटने दोन शतकांसह 10 सामन्यांत 485 धावांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. आणि त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये तुम्हाला सातत्य दाखवण्याची गरज आहे, हे त्याच्या न निवडण्यावरुन दिसून येते. मात्र, सॅमसनच्या निवडीच्या बाबतीत निवडकर्त्यांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला महत्त्व दिले असावे.

दरम्यान, आयपीएलमध्ये आणि टीम इंडियासाठी (Team India) मिळालेल्या मिळालेल्या संधीचं सोन करणारा संजू सॅमसन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या या मोसमात प्रभावी ठरला नाही. केरळकडून खेळताना त्याने 8 सामन्यात एकूण 138 धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी 27 होती आणि स्ट्राइक रेट 145 च्या जवळ होता.

त्याने दोन अर्धशतकेही झळकावली, परंतु निवडकर्त्यांना त्याची टी-20 संघासाठी निवड करणे कठीण वाटले आणि त्यांनी युवा जितेश शर्माची निवड केली. या मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक असेल.

भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

-श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यात उपकर्णधार असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT