India vs Australia Final, Team India Playing 11: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. फायनल सामन्यातही अनेक समीकरणे भारताच्या बाजूने आहेत. संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय नोंदवला होता. मात्र, रोहित ब्रिगेड एका बदलाने विश्वचषकाच्या फायनलमध्ये उतरु शकते. शुक्रवारी टीम इंडियाच्या सराव सत्रातून याचे संकेतही मिळाले होते.
दरम्यान, टीम इंडियाने शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर जोरदार सराव केला. यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने स्लिप क्षेत्ररक्षणाचा भरपूर सराव केला. त्यामुळे फायनल सामन्यात खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल ठरेल, अशी अटकळ बांधली जाऊ लागली. याशिवाय, स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननेही गोलंदाजीचा जोमाने सराव केला.
रोहित शर्माची स्लिप क्षेत्ररक्षण आणि अश्विनची गोलंदाजी पाहिल्यानंतर फायनल सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांसह भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरु शकतो, अशी शक्यता आहे. अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास मोहम्मद सिराजला बाहेर बसावे लागू शकते. याशिवाय, संघात कोणतेही बदल अपेक्षित नाहीत.
तसेच, अश्विनला फायनल सामना खेळवण्याची अनेक कारणे आहेत. खरे तर, अश्विनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे. याशिवाय, डेव्हिड वॉर्नरविरुद्धही तो खूप प्रभावी ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर लेफ्टी आहेत. हे देखील एक कारण आहे की, टीम इंडियात ऑफस्पिनरचा समावेश केला जाऊ शकतो.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज/रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.