बीसीसीआय (BCCI) भारतीय संघासाठी प्रशिक्षकाच्याही (coach) शोधात आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

न्यूझीलंड विरुध्दच्या मालिकेत टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक

बीसीसीआय (BCCI) या आठवड्याच्या अखेरीस नवीन प्रशिक्षक (coach) आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यास तयार आहे.

दैनिक गोमन्तक

बीसीसीआयसाठी (BCCI) ऑक्टोबर महिना खूप व्यस्त असल्याचे दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या महिन्यात दोन नवीन आयपीएल (IPL) संघांना अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत आहे. आयपीएलसाठी नवीन मीडिया अधिकार निविदा जारी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बीसीसीआय 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकाचे (T20 World Cup) आयोजन देखील करत आहे. त्याचबरोबर बीसीसीआय भारतीय संघासाठी प्रशिक्षकाच्याही (coach) शोधात आहे. ज्यासाठीची नियुक्ती प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय या आठवड्याच्या अखेरीस नवीन प्रशिक्षक आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यास तयार आहे. याबाबत एका माध्यमाशी बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, आम्ही या आठवड्याच्या अखेरीस नवीन प्रशिक्षकासाठी जाहिरात प्रसिद्ध करीत आहोत. याबाबतचे निकष आणि आवश्यकता आम्ही या आधिच पाहिल्या आहेत. न्यूझीलंड मालिकेपूर्वी आमच्याकडे नवीन प्रशिक्षक आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी असतील.

दुबईमध्ये टी -20 विश्वचषक फायनलनंतर तीन दिवसांनी भारत (India) विरुध्द न्यूझीलंड (New Zealand) मालिकेला सुरुवात होत आहे. 17 नोव्हेंबरपासून भारतातच ही मालिका होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Noise Pollution: वागातोरला ध्वनिप्रदूषणाचा त्रास! कारवाईकडे लक्ष; ट्रान्स म्युझिक पार्ट्यांमुळे लोक हैराण

Police Recruitment: 800 मीटर धावण्याच्या चाचणीला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फेटाळली, 6 उमेदवारांनी घेतला होता आक्षेप

Goa Lokotsav: फूड कोर्ट, चिनी मातीच्‍या वस्‍तूंची अनेकांवर मोहिनी; 'लोकोत्‍सवा'ला स्‍थानिकांसह पर्यटकांचीही गर्दी

Goa Municipal Election: महापालिका निवडणूक; बाबूश यांना घेरण्याची तयारी, विरोधकांची 'एकसंध' मोर्चेबांधणी; उत्पलकडे नजरा...

Omkar Elephant: ...अखेर 'ओंकार' आपल्‍या कळपात, वन अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्र्वास

SCROLL FOR NEXT