TATA Group IPL title sponsorship rights:
इंडियन प्रीमियर लीग गेली 17 वर्षे क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान या टी20 लीग स्पर्धेत जाहीराती, स्पॉन्सर्स अशा अनेक गोष्टींमधून कोट्यवधी रुपयांची उलाढालही होत असते.
दरम्यान, आता बीसीसीआयने माहिती दिली आहे की पुढील 5 वर्षांसाठी टाटा ग्रुप आयपीएलचे टायटल स्पॉन्सर्स असणार आहेत. याबाबत अधिकृत निर्णय शनिवारी जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान प्रत्येक वर्षासाठी आता टाटा ग्रुपकडून टायटल स्पॉन्सर्स म्हणून 500 कोटी रुपये बीसीसीआयने देणार आहेत. म्हणजेच पाच वर्षांसाठी टाटा ग्रुपकडून बीसीसीआयने 2500 कोटी रुपये दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे स्पर्धेच्या इतिहासातील ही स्पॉन्सरशीपसाठी दिली गेलेली सर्वोच्च रक्कम आहे.
टाटा यापूर्वी 2022 आणि 2023 हंगामांसाठीही टायटल स्पॉर्नर्स होते. तसेच वूमन प्रीमियर लीगचेही टाटा ग्रुपच टायटल स्पॉन्सर्स आहेत.
खरंतर 2018 मध्ये पाच वर्षांसाठी विवोने टायटल स्पॉन्सर म्हणून करार केला होता, परंतु, भारत-चीन यांच्यातील राजकीय तणावामुळे हा करार आणि कोरोना व्हायरस अशा काही गोष्टींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे या काळात ड्रीम-11 देखील टायटल स्पॉन्सर्स होऊन गेले. तसेच 2022 मध्ये टाटा ग्रुपने स्पॉन्सरशीपचे हक्क जिंकले.
आता पुन्हा एकदा सर्वाधिक बोली लावत टाटा ग्रुपने आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क जिंकले आहेत. त्यामुळे 2028 पर्यंत टाटा आयपीएल या नावानेच आयपीएल ओळखले जाईल.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबद्दल टाटा ग्रुपचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, यंदा आयपीएलचा १७ वा हंगाम खेळवला जाणार आहे. मार्चच्या मध्यात या हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.