T20 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

Virat Kohli Record: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सध्या अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत सुपर-८ फेरीत पोहोचणारे सर्व ८ संघ निश्चित झाले आहेत.

Sameer Amunekar

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सध्या अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत सुपर-८ फेरीत पोहोचणारे सर्व ८ संघ निश्चित झाले आहेत. मात्र, या स्पर्धेत सध्या सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे भारतीय दिग्गज विराट कोहलीच्या एका मोठ्या जागतिक विक्रमाची. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने आपल्या बॅटने असा धमाका केला आहे की, विराट कोहलीचा ऐतिहासिक विक्रम आता मोडकळीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विराटचा 'तो' विक्रम आणि फरहानची झेप

२०१४ च्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने ६ सामन्यांत ३१९ धावा फटकावून एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. गेल्या १०-१२ वर्षांपासून हा विक्रम अबाधित आहे. मात्र, साहिबजादा फरहानने यंदाच्या स्पर्धेत केवळ ४ सामन्यांत २२० धावा केल्या आहेत. यात एक स्फोटक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. आता विराटचा विक्रम मोडीत काढण्यासाठी फरहानला केवळ १०० धावांची गरज आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचल्यामुळे फरहानला श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध किमान तीन डावांत फलंदाजीची संधी मिळणार आहे.

नामीबियाविरुद्ध ऐतिहासिक शतक

पाकिस्तानसाठी 'करा किंवा मरा' अशा परिस्थितीत असलेल्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात फरहानने शानदार शतक झळकावले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात शतक ठोकणारा तो केवळ दुसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये अहमद शहजादने बांगलादेशविरुद्ध १११ धावा केल्या होत्या. फरहानच्या या खेळीमुळे पाकिस्तानने २०० धावांचा डोंगर उभा केला आणि आपला सुपर-८ चा मार्ग सुकर केला.

बाबर आझमच्या स्थानावर टांगती तलवार?

साहिबजादा फरहानच्या या जबरदस्त फॉर्ममुळे पाकिस्तानच्या संघ रचनेत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. फरहानने सलामीवीराची जागा निश्चित केल्यामुळे कर्णधार बाबर आझमला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागत आहे. बाबर हा प्रामुख्याने वरच्या फळीतील फलंदाज म्हणून ओळखला जातो, मात्र मधल्या फळीत तो फारसा प्रभावी ठरत नसल्याचे चित्र आहे. नामिबियाविरुद्ध तर त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. त्यामुळे आता फरहानचा वाढता प्रभाव बाबर आझमच्या टी-२० मधील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "एका सेल्फीसाठी 100 रुपये लागतील!", वैभव सूर्यवंशीने मुलांकडे मागितले पैसे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Navpancham Drishti Yog 2026: "धाडसी निर्णय घ्या अन् मालामाल व्हा!" गुरु-वरुणचा नवपंचम दृष्टी योग, 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; घरात नांदणार सुख-समृद्धी

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

SCROLL FOR NEXT