MS Dhoni, Usman Tariq Dainik Gomantak
क्रीडा

India vs Pakistan: धोनी आणि पाकिस्तानी फिरकीपटूचं काय आहे 'खास' नातं? उस्मान तारिकनं सांगितला 'तो' रंजक किस्सा

Usman Tariq: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या रणधुमाळीत सध्या एका नावाचा मोठा बोलबाला पाहायला मिळत आहे, ते नाव म्हणजे पाकिस्तानचा २८ वर्षीय फिरकीपटू उस्मान तारिक.

Sameer Amunekar

Usman Tariq MS Dhoni inspiration

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या रणधुमाळीत सध्या एका नावाचा मोठा बोलबाला पाहायला मिळत आहे, ते नाव म्हणजे पाकिस्तानचा २८ वर्षीय फिरकीपटू उस्मान तारिक. आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीने फलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या उस्मानने केवळ खेळानेच नाही, तर आपल्या संघर्षमय प्रवासाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत अवघ्या एका सामन्यात ३ बळी मिळवत त्याने आपली चुणूक दाखवली असून, आता भारतीय फलंदाजांसमोर त्याचे 'मिस्ट्री' स्पिन रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

फलंदाजांसाठी ठरणार घातक

उस्मान तारिकची गोलंदाजी करण्याची पद्धत इतर गोलंदाजांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्याचा हात खालच्या बाजूने येतो, ज्याला 'साइड-आर्म' ॲक्शन म्हटले जाते. चेंडू फेकण्यापूर्वी तो हवेत थोडा वेळ थांबतो, ज्यामुळे चेंडूचा वेग आणि वळण ओळखणे फलंदाजांना कठीण जाते. या विचित्र ॲक्शनमागील गुपित उस्मानने स्वतः उघड केले आहे.

त्याच्या कोपराचे हाड नैसर्गिकरित्या दोन ठिकाणी जोडलेले आहे, ज्यामुळे त्याचा हात चेंडू टाकताना आपोआप वळतो. अनेकदा त्याच्यावर चेंडू फेकून मारल्याचा संशय घेतला गेला, परंतु वैद्यकीय चाचणीत त्याच्या शरीराची ही रचना नैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हीच 'बायोलॉजिकल' ताकद आता टीम इंडियासाठी मोठे संकट ठरू शकते.

धोनी ठरला 'रिअल हिरो'

उस्मान तारिकचा इथपर्यंतचा प्रवास एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो दुबईत एका नामांकित कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता. नोकरी चांगली होती, पण मन मात्र क्रिकेटमध्ये अडकले होते. अशा काळात त्याने भारतीय दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ पाहिला.

सरकारी नोकरी सोडून क्रिकेटसाठी संघर्ष करणाऱ्या धोनीच्या कथेने उस्मानला इतकी प्रेरणा दिली की, त्याने क्षणाचाही विचार न करता आपली नोकरी सोडली आणि पाकिस्तान गाठले. धोनीच्या प्रेरणेतून त्याने पुन्हा एकदा मैदानात घाम गाळण्यास सुरुवात केली आणि आज तो पाकिस्तानचा प्रमुख अस्त्र बनला आहे.

उस्मानची आकडेवारी

उस्मानने वयाच्या २७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत खेळलेल्या ४ टी-२० सामन्यांत त्याने केवळ ५.९३ च्या इकॉनॉमी रेटने ११ गडी बाद केले आहेत. विशेष म्हणजे, त्याने एकदा एकाच डावात ४ बळी घेण्याची किमयाही साधली आहे. चेंडूवर असलेले कमालीचे नियंत्रण आणि हवेत चेंडूचा वेग बदलण्याची कला यामुळे उस्मान तारिक २०२६ च्या विश्वचषकात पाकिस्तानचा सर्वात मोठा 'एक्स-फॅक्टर' मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT