Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: फायनलमध्ये टीम इंडिया या संघाशी भिडणार, माजी भारतीय कर्णधाराची भविष्यवाणी

Team India: टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद जिंकण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup: T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्याबाबत एक मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे, त्यानुसार भारताचा सामना जेतेपदाच्या लढाईत अत्यंत धोकादायक संघाशी होणार आहे. टी-20 विश्वचषक 2022 चे विजेतेपद जिंकण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि या संघामध्ये होणार

यावेळी, टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून भारत 15 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणेल, यावर सर्वात मोठ्या क्रिकेट तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. टीम इंडियाने (Team India) अखेरचा 2007 टी-20 विश्वचषक महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता, पण आता टीम इंडियाला 15 वर्षांनंतर या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.

भारताच्या माजी कर्णधाराचा अंदाज

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात होणार असल्याचे सांगत मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताची माजी कर्णधार मिताली राज सध्या टी-20 विश्वचषक 2022 साठी कॉमेंट्री करत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करतील

मिताली राजने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, 'मला विश्वास आहे की, ग्रुप 2 मधील भारत आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित करतील. दुसरीकडे, ग्रुप 1 मधून न्यूझीलंडसह, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

समालोचन विश्वात पदार्पण केले

मिताली राजला टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्याच्या अंदाजाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने कोणत्याही शंका न घेता भारत आणि न्यूझीलंडचे नाव घेतले. मितालीने नुकतेच कॉमेंट्री विश्वात पदार्पण केले आहे. मिताली राज स्टार स्पोर्ट्सशी जोडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT