Swapnil Asnodkar Dainik Gomantak
क्रीडा

Cricket News : स्वप्नीलकडे ‘एनसीए’ची महत्त्वाची जबाबदारी

कटक येथील 16 वर्षांखालील विभागीय शिबिरासाठी फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती

किशोर पेटकर

गोव्याचा माजी रणजी करंडक क्रिकेट कर्णधार, 25 वर्षांखालील संघ प्रशिक्षक स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

कटक येथील 16 वर्षांखालील मुलांच्या विभागीय प्रशिक्षण शिबिरासाठी स्वप्नील यांनी फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली.

कटक येथील बाराबती स्टेडियमवर सोमवारपासून (ता. 17) शिबिरास सुरवात होईल आणि ते 11 मेपर्यंत चालेल. या शिबिरात स्वप्नील फलंदाजी प्रशिक्षक असतील. यासंबंधी एनसीएतर्फे स्वप्नील यांना कळविण्यात आले असून ते रविवारी शिबिरास्थळी दाखल झाले.

गतवर्षी एनसीएतर्फे क्रिकेट प्रशिक्षकांसाठी घेतलेल्या हायब्रिड लेव्हल-२ अभ्यासक्रमात स्वप्नील विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. ते यंदा गोव्याच्या 25 वर्षांखालील क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यापूर्वी तीन मोसम त्यांनी गोव्याच्या 23 वर्षांखालील, तसेच 19 वर्षांखालील संघासाठी मार्गदर्शकाची जबाबदारी पेलली होती.

एनसीए विभागीय शिबिरासाठी फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याबद्दल स्वप्नील यांनी बीसीसीआय, एनसीए आणि गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) आभार मानले आहेत.

गोव्यातर्फे सर्वाधिक रणजी धावा

स्वप्नील सध्या 39 वर्षीय आहेत. गोव्यातर्फे त्यांनी 84 रणजी क्रिकेट सामन्यांत १४ शतकांसह त्यांनी सर्वाधिक 5731 धावा केल्या आहेत. एकंदरीत 4 दुलिप करंडक सामन्यांसह त्यांनी 88 प्रथम श्रेणी सामन्यांत 40.02 च्या सरासरीने 5883 धावा नोंदविल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT