Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

Cheteshwar Pujara: कॅप्टन पुजारावर निलंबनाची मोठी कारवाई, 'या' कारणामुळे मिळाली शिक्षा

Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजारावर इंग्लंडमध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Sussex Captain Cheteshwar Pujara suspended from one match in County Championship:

चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धा खेळण्यात व्यस्त होता. मात्र आता त्याला या स्पर्धेदरम्यान निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या आचार संहितेच्या उल्लंघनाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई झाली आहे. त्याला एका सामन्याच्या बंदीला सामोरे जावे लागले आहे.

पुजारा या काउंटी हंगामात एप्रिलमध्ये ससेक्स क्लबच्या प्रथम श्रेणी संघाचा कर्णधार झाला होता. दरम्यान, त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना ससेक्सच्या तीन खेळाडूंनी लिसेस्टरशायरविरुद्ध गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यात खराब वर्तन केले.

त्याचमुळे संघाचे १२ गुण कापण्यात आले आहेत. त्यामुळे या हंगामात ससेक्सला ४ पेनल्टी मिळाल्याने कर्णधाराला बंदीला सामोरे जावे लागते. त्याच नियमानुसार कर्णधार म्हणून पुजारा पुढील डर्बीशायरविरुद्धचा सामना खेळणार नाही.

ससेक्सने लिसेस्टरशायर विरुद्ध १५ धावांनी विजय मिळवला होता. मात्र, या सामन्यात ससेक्सच्या जॅक कार्सन, टॉम हेन्स आणि अरी कार्वेलास या खेळाडूंच्या वाईट वर्तवणूकीमुळे या विजयाला गालबोट लागले होते. हे तिन्ही खेळाडूही डर्बीशायरविरुद्ध सामना खेळणार नाही.

तसेच याबरोबरच आता पुजाराने संघाचाही निरोप घेतला आहे. त्याने निरोप घेताना झालेल्या प्रकाराबद्दल निराशा व्यक्त करत आगामी सामन्यासाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने लिहिले आहे की 'अशाप्रकारे निरोप घेताना वाईट वाटत आहे, पण या काउंटी हंगामाकडे मागे वळून पाहिले, तर अनेक आनंदाचे क्षण आणि अविस्मरणीय आठवणी आहेत. या संघाने दाखवलेल्या धैर्याबद्दल अभिमान वाटतो. ससेक्स संघाला उर्वरित दोन सामन्यांसाठी शुभेच्छा.'

दरम्यान, ससेक्सचे १२ गुणही कामण्यात आल्याने आता ते गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर घसरले आहेत. ते दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वर्सेस्टरशायरपेक्षा ३० गुणांनी मागे आहेत. त्यांचे आता या हंगामातील दोनच सामने बाकी आहेत.

या हंगामात पुजाराची ससेक्सकडून शानदार कामगिरी राहिली. त्याने ८ सामन्यांमध्ये ५४.०८ च्या सरासरीने ६४९ धावा केल्या. यात त्याच्या ३ शतकांचा आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT