Suryakumar Yadav Dainik Gomatak
क्रीडा

Suryakumar Yadav: सूर्या पुन्हा 'ICC T20 क्रिकेटर ऑफ द इयर' च्या शर्यतीत; या खेळाडूंचे कडवे आव्हान

Suryakumar Yadav: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा बुधवारी ICC मेन्स 'T20 क्रिकेटर ऑफ द इयर'साठी चार नामांकनांमध्ये समावेश करण्यात आला.

Manish Jadhav

Suryakumar Yadav: टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा बुधवारी 'ICC मेन्स 'T20 क्रिकेटर ऑफ द इयर'साठी चार नामांकनांमध्ये समावेश करण्यात आला. भारताच्या या 33 वर्षीय खेळाडूने 2022 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. 2023 मध्ये, सूर्यकुमारने आपला दबदबा निर्माण केला होता. 17 डावांमध्ये 48.86 च्या सरासरीने आणि 155.95 च्या स्ट्राइक रेटने 733 धावा केल्या होत्या. सूर्यकुमारने 2023 ची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध अवघ्या सात धावांनी केली पण त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात त्याने 51 (36 चेंडू) आणि नाबाद 112 धावा (51 चेंडू) केल्या होत्या.

दरम्यान, सूर्यकुमारच्या 51 चेंडूत नाबाद 112 धावांच्या खेळीत नऊ षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. त्याने जवळजवळ प्रत्येक तीन चेंडूंत एक चौकार मारला होता. यासह, तो रोहित शर्मानंतर मेन्स T20 सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान शतक करणारा दुसरा खेळाडू ठरला होता.

रोहितने 2017 मध्ये याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 35 चेंडूत ही कामगिरी केली होती. त्यानंतर तो 20 ते 40 धावा करत राहिला, त्यानंतर प्रॉव्हिडन्समध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 44 चेंडूत 83 धावांच्या खेळीने त्याचा 'क्लास' सिद्ध केला. त्यानंतर फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 45 चेंडूत 61 धावा करत त्याने मालिका संपवली होती.

दुसरीकडे, कर्णधारपदाचा दबाव असूनही सूर्याच्या बॅटमधून धावा येत राहिल्या. त्याने वर्षाच्या अखेरीस युवा भारतीय संघाची कमान संभाळली होती. जोहान्सबर्ग येथे वर्षाच्या शेवटच्या T20 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 42 चेंडूत 80 धावा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 36 चेंडूत 56 धावा आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 56 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या अन्य तीन खेळाडूंमध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (11 डावात 515 धावा, 17 विकेट), युगांडाचा अल्पेश रामजानी (55 विकेट) आणि न्यूझीलंडचा मार्क चॅपमन (17 डावात 556 धावा) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT