Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: सूर्याची कारकीर्द उद्ध्वस्त करणारे 4 सामने, अचानक संघासाठी बनला ओझं!

Suryakumar Yadav IPL 2023: आयसीसी (ICC) च्या T20 रँकिंगमधील नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या अतिशय खराब फॉर्मशी झुंजत आहे.

Manish Jadhav

Suryakumar Yadav IPL 2023: आयसीसी (ICC) च्या T20 रँकिंगमधील नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या अतिशय खराब फॉर्मशी झुंजत आहे. 2023 मध्ये जणू त्याच्या बॅटमधून धावा येणं बंद झालं आहे.

टीम इंडियानंतर आयपीएलमध्येही तो आपल्या टीमवर ओझं ठरताना दिसत आहे. सूर्यकुमार यादवने नुकतेच खेळलेले 4 सामने त्याच्या कारकिर्दीसाठी धोकादायक ठरत आहेत.

4 सामने ज्याने सूर्याची कारकीर्द उद्ध्वस्त केली

आयपीएल 2023 चा 16 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादव क्रीझवर आला आणि खाते न खोलता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, 2023 मध्ये हे पहिल्यांदा घडलेले नाही.

गेल्या 6 सामन्यांमध्ये सूर्या 4 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याच्या खराब कामगिरीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

आयपीएलपूर्वी टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. या मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये सूर्या शून्यावर बाद झाला होता. आता आयपीएलमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.

सहकारी खेळाडूने सूर्याचा बचाव केला

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झालेला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, संघाचा अनुभवी लेगस्पिनर पियुष चावला याने त्याचा फॉर्म चिंतेचा विषय नसल्याचे म्हटले आहे.

चावला सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'सूर्याचा फॉर्म कधीही चिंतेचा विषय नव्हता. या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यासाठी त्याला फक्त 10 चेंडूंची गरज आहे. तो चार चौकार मारेल आणि फॉर्मात येईल.'

2022 मध्ये आश्चर्यकारक कामगिरी

2022 मध्ये सूर्यकुमार यादव हा टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. या वर्षी त्याने 31 डावांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1,164 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 9 अर्धशतके आणि 2 शतके झळकली.

सूर्यकुमार यादव या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यासह, तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील बनला आहे. परंतु 2023 मध्ये तो आपल्या शानदार खेळाची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावमधील महिला उतरल्या रस्त्यावर! सरकारसह लोकप्रतिनिधी लक्ष्य; खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Sattari: सत्तरी तालुका लवकरच टँकरमुक्त! आमदार राणे यांचा निर्धार; वेळुस येथे 1.5 कोटींच्या कामाची पायाभरणी

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

SCROLL FOR NEXT