Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy: टी20 फॉरमॅटमधून सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन बाजूला करुन, त्याच्या जागी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे.

Manish Jadhav

Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy: टी20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाने आतापासूनच 2028 मध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषकासाठीची तयारी सुरु केली. या दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) संघात काही मोठे आणि धक्कादायक बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या वृत्तसंकेतांनुसार, टी20 फॉरमॅटमधून सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन बाजूला करुन, त्याच्या जागी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहे. मात्र, बीसीसीआयच्या (BCCI) या संभाव्य निर्णयावर भारतीय संघाच्या पूर्व मुख्य निवडकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, सूर्याला अशा प्रकारे अचानक कर्णधारपदावरुन हटवणे अत्यंत चुकीचे पाऊल ठरेल, असा इशारा दिला.

पूर्व मुख्य निवडकर्त्यांनी एका विशेष मुलाखतीत या वादावर आपले स्पष्ट मत मांडताना अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आगामी दौऱ्यासाठी तुम्ही तुमचा मुख्य संघ पाठवत आहात की दुय्यम संघ? जर मुख्य संघ खेळणार असेल, तर सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूला कर्णधारपदावरुन हटवणे योग्य होणार नाही. सूर्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या नेतृत्वाखाली नुकताच भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिला.

जर भविष्यासाठी नवीन कर्णधार तयार करायचा असेल, तर पुढील पाच-सहा महिन्यांत योग्य प्रक्रिया राबवून कोणाला तरी तयार केले पाहिजे. सध्या अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद आहे, त्यामुळे त्याच्या नावाचाही विचार होऊ शकला असता किंवा एखाद्या तरुण खेळाडूला सूर्याचा उपकर्णधार बनवून त्याच्या हाताखाली तयार करणे अधिक फायद्याचे ठरले असते.

दुसरीकडे, श्रेयस अय्यर व्यतिरिक्त कर्णधारपदाच्या इतर शर्यतीबाबत विचारले असता, पूर्व मुख्य निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्या हा या पदासाठी सर्वात मजबूत दावेदार असल्याचे सांगितले. त्याखालोखाल श्रेयस अय्यर, ईशान किशन, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन हे देखील कप्तानीच्या शर्यतीत आणि रांगेत उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) कर्णधारपदावरुन हटवण्याच्या या अंतर्गत हालचालींमागे त्याचा वैयक्तिक फॉर्म हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. टी20 विश्वचषकात भारताने विजेतेपद मिळवले असले, तरी सूर्याची बॅट संपूर्ण स्पर्धेत शांत राहिली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या हंगामात त्याला फॉर्ममध्ये परतण्याची उत्तम संधी होती, परंतु खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. एकीकडे सूर्या धावा काढण्यासाठी संघर्ष करत असतानाच, संघातील इतर तरुण खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन संघात आपले स्थान आणि दावा अधिक मजबूत केला. यामुळेच आता श्रेयस अय्यरच्या रुपाने टीम इंडियाला नवीन टी20 कर्णधार मिळण्याची शक्यता बळावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

PM Modi Record: पंतप्रधान मोदींचा 'लकी 10 जून'! इंदिरा गांधींनंतर आता पंडित नेहरुंनाही टाकणार मागे; काय आहे 'तो' अद्भूत रेकॉर्ड?

वृद्धाश्रमावर काळाचा घाला! आगीत 11 वृद्धांचा होरपळून मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Sarmanas Ferry: सारमानस फेरीधक्का दिवसेंदिवस बनतोय धोकादायक; अपघातांचे सत्र सुरूच, उपाययोजना करण्याची मागणी

Goa Mango Price: आंबा पुन्‍हा 'भाव' खाऊ लागला! आवक घटली, मानकुराद 800 तर मांगेलाल 500 रुपये डझन

SCROLL FOR NEXT