Sunil Gavaskar On Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2026: "निष्काळजीपणा महागात पडेल..." सनी पाजींकडून टीम इंडियाला धोक्याचा इशारा, फलंदाजांवर ओढले ताशेरे

Sunil Gavaskar On Team India: माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजांच्या बेजबाबदार खेळीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Sameer Amunekar

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने अमेरिकेवर विजय मिळवत आपल्या मोहिमेची दिमाखात सुरुवात केली असली, तरी माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मात्र भारतीय फलंदाजांच्या बेजबाबदार खेळीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "विजयाचा आनंद असला तरी फलंदाजांची ही निष्काळजी वृत्ती आगामी सामन्यांमध्ये महागात पडू शकते," असा धोक्याचा इशारा गावस्कर यांनी दिला आहे.

सूर्याने वाचवली लाज

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजीची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अवघ्या ७७ धावांत भारताने आपले ६ प्रमुख फलंदाज गमावले होते. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे भोपळाही न फोडता तंबूत परतले.

इशान किशन, रिंकू सिंह आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र ते देखील ठराविक अंतराने बाद झाले. जर कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ८४ धावांची स्फोटक खेळी केली नसती, तर भारताला या स्पर्धेच्या सुरुवातीलाच मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले असते.

गावस्करांचा फलंदाजांना 'घरचा आहेर'

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सुनील गावस्कर म्हणाले, "१६० धावांचे आव्हान सोपे नव्हते, पण आपण ३० धावांनी जिंकलो ही चांगली गोष्ट आहे. मात्र, या विजयापेक्षा आपण केलेल्या चुकांमधून शिकणे जास्त गरजेचे आहे. तुमच्याकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची खोली आहे, हे मान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की, सुरुवातीच्या ७-८ षटकांतच तुमचे ४-५ फलंदाज बाद व्हावेत. जर समोर एखादा अनुभवी आणि बलाढ्य संघ असता, तर भारताला हे पान उलटवणे कठीण गेले असते."

गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले की, पॉवरप्लेचा अर्थ फक्त फटकेबाजी करणे असा नसून, विकेट टिकवून धावगती राखणे हा असतो. "पॉवरप्लेमध्ये सहा षटकात तुम्ही ४ विकेट गमावत असाल, तर तुम्ही स्वतःहून स्वतःला अडचणीत ढकलत आहात. विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर प्रत्येक संघ आपला सर्वोत्तम खेळ करतो, तिथे अशा चुकांना माफी नसते," असे कडक शब्द गावस्कर यांनी वापरले. भारताचा पुढील प्रवास सोपा व्हावा, यासाठी फलंदाजांनी आपल्या मानसिकतेत बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT