Sumit Nagal X
क्रीडा

Sumit Nagal: भारताच्या सुमीतचा ऐतिहासिक विजय! मानांकित बब्लिकला हारवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत

Australian Open 2024: भारताचा टेनिस स्टार सुमीत नागलने ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत धडक मारत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

Pranali Kodre

Sumit Nagal beat Alexander Bublik in first round of Australian Open 2024:

मेलबर्नला ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत एकेरीमध्ये भारताचा सुमीत नागल खेळत असून त्याने मंगळवारी ऐतिहासिक विजय मिळवला. त्याने या स्पर्धेत क्विलिफिकेशनमधून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला आहे.

मुख्य स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत त्याने मंगळवारी 31 व्या मानांकित ऍलेक्झँडर बब्लिकविरुद्ध विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सुमीलने बब्लिकविरुद्ध 6-4,6-2,7-6 (7-5) असा तीन सरळ सेटमध्ये 2 तास 38 मिनिटांत विजय मिळवला.

तो 1989 साला नंतरचा ग्रँडस्लॅम स्पर्धेत मानांकित खेळाडूविरुद्ध विजय मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहचण्याची ही सुमीतची दुसरीच वेळ आहे. त्याने यापूर्वी 2020 साली झालेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. पण दुसऱ्या फेरीत तो पराभूत झाला.

तसेच यापूर्वी 2019 सालीही सुमीत अमेरिकन ओपन स्पर्धा खेळला होता, त्यावेळी पहिल्याच फेरीत त्याला दिग्गज रॉजर फेडररविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर 2021 सालीही तो ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य स्पर्धेत खेळलेला, पण त्याला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले होते.

सुमीतचा विजय

सुमीतने बब्लिकविरुद्ध पहिले दोन्ही सेट सहज जिंकले होते. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये बब्लिकने त्याला तगडे आव्हान दिले. पहिल्या सहा गेममध्ये बरोबरीचा सामना झाला. पण सातव्या सेटमध्ये सुमीलने बब्लिकची सर्विस तोडली आणि 4-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने 5-3 अशी आघाडी घेतली.

मात्र, बब्लिकने पुनरागमन करत 5-5 अशी बरोबरी केली. नंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्विस राखल्याने 6-6 अशा बरोबरीमुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. अखेर सुमीतने टायब्रेकर 7-5 ने जिंकत सामनाही जिंकला. आता सुमीतचा दुसऱ्या फेरीतील सामना १८ जानेवारीला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT