Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

Steve Smith: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास, कसोटीत 9000 धावा पूर्ण करणारा ठरला जगातील दुसरा फलंदाज

Steve Smith: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा पूर्ण करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. स्मिथने हा पराक्रम केवळ 174 व्या डावात केला आहे.

Manish Jadhav

Steve Smith Completed 9000 Runs In Test Cricket: लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे.

यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला आहे. वास्तविक, स्टीव्ह स्मिथने आता कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा पार केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा पूर्ण करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. स्मिथने हा पराक्रम केवळ 174 व्या डावात केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारा फलंदाज

कुमार संगकारा - 172

स्टीव्ह स्मिथ - 174

राहुल द्रविड176

ब्रायन लारा - 177

रिकी पाँटिंग - 177

स्मिथ 99 वी कसोटी खेळत आहे

दरम्यान, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 99 वा सामना खेळत आहे. आतापर्यंत त्याने 59.65 च्या सरासरीने 9007 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 31 शतके, 4 द्विशतके आणि 37 अर्धशतके झळकली आहेत. त्याचवेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 239 आहे.

सामन्याची स्थीती

पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने (England) दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त खेळपट्टी तयार केली. यानंतर कर्णधार बेन स्टोक्सनेही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, असे असतानाही ऑस्ट्रेलियन फलंदाज शानदार फलंदाजी करत आहेत. 73 धावांवर पहिली विकेट पडली. उस्मान ख्वाजा 17 धावा करुन बाद झाला.

यानंतर डेव्हिड वॉर्नर 66 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. तर स्टीव्ह स्मिथ 38 आणि मार्नस लबुशेन 45 धावांवर खेळत आहेत. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 विकेटवर 190 धावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT